बहिणीची छेड काढल्यावरून युवकाचा खून; तीन हत्याकांडांनी हादरली उपराजधानी

अनिल कांबळे
Monday, 19 October 2020

गेल्या काही दिवसांपासून तो आरोपी तक्षशीलानगरातील तुषार गजभिये (२४) याच्या बहिणीला त्रास देत होता. टोमणे मारणे किंवी शेरेबाजी करीत होता. ही बाब बहिणीने भाऊ तुषारला सांगितली. त्यामुळे त्याचा पारा चढला. त्याने गोलू राजपूतचा थेट काटा काढण्याचा प्लान केला. रविवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास गोलू राजपूत उप्पलवाडी परिसरात दिसला.

नागपूर : बहिणीची वारंवार छेड काढून त्रास देणाऱ्या रोडरोमीयोचा दोघांनी चाकूने भोसकून खात्मा केला. ही थरारक घटना रविवारी रात्री आठ वाजता उप्पलवाडी परिसरात घडली. गोलू उर्फ दीपक देशराज राजपूत (२६, रा. कडू ले-आऊट) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. हत्याकांडातील दोन्ही आरोपींना कपिलनगर पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उपराजधानीत गुन्हेगारांनी पुन्हा डोकेवर काढले आहे. रात्र होताच गुन्हेगार सक्रिय होत अनेक गुन्हेगारी कृत्य करीत आहेत. कपिलनगरातील हत्याकांडात गोलू राजपूत हा कुख्यात असून तो वस्तीत दादागिरी करतो. तो नेहमी वस्तीतील तरुणी आणि महिलांची छेडखानी करण्याच्या सवयीचा होता.

जाणून घ्या - सावळीच्या मंदिर परिसरात पडला चक्क पैशांचा पाऊस; अखेर पोलिसांनी बाहेर आणले सत्य

गेल्या काही दिवसांपासून तो आरोपी तक्षशीलानगरातील तुषार गजभिये (२४) याच्या बहिणीला त्रास देत होता. टोमणे मारणे किंवी शेरेबाजी करीत होता. ही बाब बहिणीने भाऊ तुषारला सांगितली. त्यामुळे त्याचा पारा चढला. त्याने गोलू राजपूतचा थेट काटा काढण्याचा प्लान केला. रविवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास गोलू राजपूत उप्पलवाडी परिसरात दिसला.

आरोपी तुषार गजभिये आणि टोनी उर्फ प्रेम मारोतकर (२३, रा. स्वामीनगर, नारी रोड) याला फोन केला. दोघेही उप्पलवाडीत पोहोचले. गोलूला रस्त्यातच गाठले. त्याला पकडून विटा भट्टीकडे नेले. तेथे अंधारात गोलूवर तलवार आणि चाकूने सपासप वार करीत ठार केले. याप्रकरणी कपिलनगर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

अधिक वाचा - सोन्याला झळाळी; साठ हजारांचा आकडा करेल पार, ग्राहकांची पावले वळू लागली दुकानांकडे

४८ तासांत तीन हत्याकांड

शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे. गेल्या ४८ तासांत तीन हत्याकांडाने उपराजधानी हादरली आहे. शनिवारी मानकापुरात बनारसी नावाच्या युवकाचा निक्की शैलेंद्र गायकवाड (रा. म्हाडा क्वॉटर्स, पिटेसूर रोड, गोधनी रेल्वे) याने दगडाने ठेचून खून केला होता. रविवारी रात्री यशोधरानगरात राजू रंभाळ या युवकाचा दोघांनी चाकूने भोसकून खून केला. रविवारी रात्री आठ वाजता गोलू राजपूतचा दोघांनी खून केला. हत्याकांडाची मालिका सुरू असल्यामुळे नागरिकही भीतीच्या वातावरणात जगत आहेत.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Murder of a youth after teasing sister