Gram Panchayat Result : नागपुरात पाच ग्रामपंचायतींवर महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या गटाचा विजय

nagpur 127 grampanchayat election result update
nagpur 127 grampanchayat election result update

नागपूर : जिल्ह्यातील १२७ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी (ता.१५) मतदान झाले आहे. आज या सर्व ग्रामपंचायतींचा निकाल हाती येत आहेत. आतापर्यंत सहा ग्रामपंचायतींचे निकाल हाती आले असून यामध्ये सहापैकी पाच जागांवर महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या गटांचा विजय झाला आहे, तर फक्त एका जागेवर भाजपच्या नेत्यांच्या गटाला विजया मिळाला आला.   

काटोल तालुक्यातील खंडाळा ग्रामपंचायतीचा निकाल हाती आला असून त्यामध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या गटाचा विजय झाला आहे. तसेच पारशिवनी तालुक्यातील बाभुळवाडा, हिंगणा तालुक्यातील किन्ही धानोली, नरखेडमधील खैरगाव आणि अंबाडा सायवाडा ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीने झेंड फडकविला आहे. तसेच हिंगणा तालुक्यातील दाभा ग्रामपंचायतीमध्ये भाजपच्या नेत्यांचा गट विजयी झाला आहे. 

नागपूर जिल्ह्यात नरखेड, सावनेर, कळमेश्वर या तालुक्यातील एकूण चार ग्रामपंचायतींची बिनविरोध निवडून आल्या होत्या. त्यानंतर  गेल्या १५ जानेवारीला १२७ ग्रामपंचायतीसाठी मतदान घेण्यात आले. जिल्हात एकूण ७२ टक्के मतदान झाले असून आज गावगाड्याचा कारभारी ठरणार आहे.   


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com