किती हे वेड... 'पब्जी' न खेळू दिल्याने मुलाने केले हे...

'पब्जी' गेम पडतोय मुलांच्या परीक्षेवर भारी, वाचा काय झाले...
'पब्जी' गेम पडतोय मुलांच्या परीक्षेवर भारी, वाचा काय झाले...

नागपूर : सध्या बारावीची परीक्षा सुरू झाली आहे. काही दिवसांनी दहावीच्या परीक्षेला सुरुवात होणार आहे. त्यामुळे आपला पाल्य चांगले गुण उत्तीर्ण व्हावा असे सर्वच पालकांना वाटते. यामुळे ते थोडे का होईना आपल्या मुलांशी शिस्तीने वागायला सुरुवात करतात. मात्र, पाल्य ते पाल्यच. त्यांना जे करायच ते कराचच असते. नागपुरातील एका मुलाने परीक्षेच्या काळात "पब्जी' न खेळू दिल्यामुळे घर सोडलल्याचे समोर आले आहे. बऱ्याच प्रयत्नानंतर तो कुटुंबीयांना गवसला. पब्जीसाठी मुलं काहीही करीत असल्याने पालकांसमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गिट्टीखदान पोलिस ठाण्याच्या हद्दीतील फ्रेण्ड्‌स कॉलनी परिसरात उघडकीस आलेल्या घटनेत डॉक्‍टर दाम्पत्याच्या मुलाने आपले घरच सोडले. मुलगा बाराव्या वर्गात शिकत आहे. बारावीची परीक्षा असतानाही मुलगा दिवसभर "पब्जी' खेळत असल्याने आई-वडील त्याला रागावले. तसेच त्याच्याकडून मोबाईलही काढून घेतला. 

या रागात दोन दिवसांपूर्वी त्याने घर सोडले होते. मुलगा अचानक बेपत्ता झाल्याने चिंताग्रस्त झालेल्या पालकांनी सर्वत्र शोधाशोध केली. दिवसभर मुलगा घरी न परतल्याने आई-वडील चिंतेत होते. शेवटी गिट्टीखदान पोलिस ठाण्यात पोहोचून पोलिसांची मदत घेतली. पोलिसांच्या अथक प्रयत्नामुळे एका उद्यानातून मुलगा सापडला. तो दिवसभर उद्यानात एकटाच बसलेला होता. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती. मुलगा घरी परतल्याने आई-वडिलांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला. 

विद्यार्थी पब्जीच्या आहारी

शहरातील लाखो शाळकरी विद्यार्थी व तरुण पब्जी गेमच्या आहारी गेलेले आहेत. अनेकांनी पब्जीच्या नादात आत्महत्या केल्या आहेत. काहींना मानसिक आजाराने ग्रासले आहे. एका व्यापाऱ्याच्या मुलाने "पब्जी'साठी आपल्या मित्रांवर लाखो रुपये उधळले. एका तरुणीने बेलतरोडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आत्महत्या केली. एका न्यायाधीशांचा आणि प्राध्यापकाचा मुलगा "पब्जी' खेळण्यासाठी चक्‍क स्वतःला घरात कोंडून घेत असल्याची माहिती समोर आली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com