Breaking: नागपूर जिल्ह्यातील रुग्णालयात ऑक्सिजन संपल्यामुळे तब्बल ४ रुग्णांचा मृत्यू; कन्हानमधील घटना

Nagpur Breaking News 4 corona patients are no more due to lack of oxygen in WCL hospital
Nagpur Breaking News 4 corona patients are no more due to lack of oxygen in WCL hospital

नागपूर : नागपुरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. बाधितांबरोबरच मृत्यूचंही प्रमाण अधिक आहे त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. रुग्णालयांमध्ये बेड्स मिळवण्यासाठी लोकांना अक्षरशः वेटिंग लिस्टमध्ये राहावं लागतय. जिल्ह्यात एकूणच ऑक्सिजन, व्हेन्टिलेटर्स बेड्सची कमतरता आहे. मात्र या परिस्थित  आणखी एक धक्कदायक घटना घडली आहे. 

नागपुरातील वेल्ट्रीट हॉस्पिटलला आग लागून ४ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला होता. मात्र ही घटना ताजीच असताना आता एक धकाकदायक घटना कन्हान- कादरी इथल्या जवाहरलाल नेहरू केंद्रीय चिकित्सालयातील कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन संपल्याने चार रुग्णांचा मृत्यु झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार हे चारही रुग्ण गंभीर होते. 

राज्याचे क्रीडा मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते अवघ्या दोन दिवसांपूर्वी या कोविड सेंटरचं उदघाटन करण्यात आलं होतं. जिल्ह्यातील अनेक रुग्णांना या सेंटरमध्ये भरती करण्यात आलं होतं. यापैकीकाही रुग्ण गंभीर होते. मात्र आज अचानक ऑक्सिजन संपल्यामुळे यापैकी चार रुग्णांचा मृत्यू झाला. प्रशासनाकडून वारंवार ऑक्सिजनचा साथ असल्याचा दावा करण्यात येत होता. मात्र आज ही दुर्दैवी घटना घडल्यामुळे यावर प्रश्नचिन्हं निर्माण झालंय.

घडलेल्या प्रकाराबद्दल रुग्णालय प्रशासनाला विचारणा केली असता. या प्रकाराबाबत कुठलीही प्रतिक्रया देण्यास रुग्णालयाकडून नकार देण्यात आला आहे. मात्र यामुळे मृतांचे नातेवाईक चांगेलच संतापले आहेत. रुग्णालय आणि प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप नातेवाईकांकडून करण्यात येतोय. 

एकूणच या धक्कादायक आणि दुर्दैवी प्रकारामुळे नागपुरातील तोकड्या सुविधांमुळे रुग्णांना आपला जीव गमवावा लागत आहे. 

संकलन आणि संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com