तुमचा जीव गेला तरी चालेल, पण ड्युटी करा; कारागृहाचा अजब-गजब फरमान

Nagpur Central Jail under discussion due to corona
Nagpur Central Jail under discussion due to corona

नागपूर : मध्यवर्ती कारागृहातील कर्मचाऱ्यांचा कोरोना अहवाल बुधवारी दुपारीच जेल प्रशासनाकडे आला होता. मात्र, सायंकाळपर्यंत कर्मचाऱ्यांकडून ड्युटी करवून घेण्यासाठी कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या कर्मचाऱ्यांना सांगण्यात आले नव्हते, अशी धक्‍कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे फक्‍त ड्युटी पूर्ण घेण्यासाठी जेलरने कर्मचाऱ्यांसह कैद्यांच्या जीवाशी खेळ केल्याची चर्चा आहे. 

जेलमधील विश्‍वसनीय सूत्रांनुसार मिळालेल्या माहितीनुसार, कारागृह अधीक्षक अनुप कुमरे यांनी कारागृह महासंचालकांकडून आलेल्या पत्राला केराची टोपली दाखवत कर्मचाऱ्यांना सक्‍तीने कारागृहात लॉकडाउन केले. त्यामध्ये कर्मचाऱ्यांची योग्य प्रकारे आरोग्य तपासणी करण्यात आली नाही. लॉकडाउन असताना कारागृहात मनमानी कारभार सुरू ठेवला.

डिलिव्हरी बॉयच्या हातून हल्दीराममधून केक बोलावण्यात आला. तो केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. बाहेरून आलेला डिलिव्हरी बॉय बाधित असण्याची शक्‍यता आहे. त्यामुळेच जेलमध्ये कोरोना ब्लास्ट झाल्याचे बोलले जाते. कारागृहातील महिला कर्मचाऱ्यांना लहान बाळ किंवा कुटुंब याचा विचार न करता दमदाटी करीत कारागृहात लॉकडाउन करण्यात आल्याचा आरोप होत आहे. 

जबाबदार कोण?

विदर्भातील एकाही कारागृहात कर्मचाऱ्यांना लॉकडाउन करण्यात आले नाही. परंतु, एसपी कुमरे यांनी केवळ "स्टंटबाजी' करण्यासाठी लॉकडाउन केले. बुधवारी कोरोना रिपोर्ट आल्यानंतर सायंकाळपर्यंत कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांना माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे बाधित कर्मचारी सर्रासपणे कारागृहात आपापल्या ड्युटी करीत होते. तसेच कुटुंबीयांमध्ये वावरत होते.

कारागृहातील कारभार सुसाट

योगेश देसाई यांची बदली झाल्यानंतर डीआयजी म्हणून स्वाती साठे यांची बदली नागपुरात झाली. मात्र, बदली झाल्यानंतर त्यांनी कामकाजावर लक्ष न देता चार्ज स्वीकारून पुणे गाठले. त्यामुळे नागपूर मध्यवर्ती कारागृह सध्या वाऱ्यावर आहे. कुणाचेही नियंत्रण नसल्यामुळे कारागृहातील कारभार सुसाट आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com