शाब्बास नागपूरकर, तुम्ही करून दाखवलं... शहरात १०० टक्के जनता कर्फ्यू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 मार्च 2020

जिल्हा प्रशासन तसेच महापालिका आयुक्तांनी शहरात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा लागू करीत अत्यावश्‍यक सेवावगळता सर्व खाजगी कार्यालये, कॉर्पोरेट ऑफिस, दुकाने बंद करण्याचे निर्देश काल, शुक्रवारी दिले होते. आयुक्तांनी तर एकप्रकारे "लॉकडाऊन' जाहीर केले होते. त्यानुसार सकाळपासून शहराच्या विविध भागात संचारबंदी दिसून आली.

नागपूर : संपूर्ण जगावर कोरोना व्हायरसचे भीषण संकट घोंगावत आहे. त्यामुळे कोरोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. या आवाहनाला नागपूरकरांनी शंभर टक्के प्रतिसाद दिल्याचे रविवारी दिसून आले. सकाळपासूनच शहरातील सर्वच प्रमुख रस्ते निर्जन दिसून आले. एकामागे एक वाहनांच्या रांगा बघण्याची सवय असलेल्या नागरिकांना रस्त्यावर एकही वाहन दिसले नाही.

Image may contain: plant, flower, tree, basketball court, outdoor and nature
तुकडोजी चौक

जिल्हा प्रशासन तसेच महापालिका आयुक्तांनी शहरात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा लागू करीत अत्यावश्‍यक सेवावगळता सर्व खाजगी कार्यालये, कॉर्पोरेट ऑफिस, दुकाने बंद करण्याचे निर्देश काल, शुक्रवारी दिले होते. आयुक्तांनी तर एकप्रकारे "लॉकडाऊन' जाहीर केले होते. त्यानुसार सकाळपासून शहराच्या विविध भागात संचारबंदी दिसून आली.

Image may contain: sky and outdoor
त्रिमुर्ती नगर

Image may contain: sky, tree and outdoor
त्रिमुर्ती नगर

- कोरोना बचावासाठी गो कोरोना फोर लेअर मास्क आणि गो कोरोना सॅनिटायझर

रस्ते निर्जन, नागपूरकर घरात 
शहरातील इंदोरा, सक्करदरा, जगनाडे चौक, दिघोरी, मानेवाडा, नरेंद्रनगर, सदर, गड्डीगोदाम, ग्रेट नाग रोड, लिज रोड, रिंग रोड, महाल, इतवारी, सेंट्रल एव्हेन्यू, रामझूला, सिव्हिल लाईन, सेंट्रल बाजार रोड, रामदासपेठ, खामला रोड, ऑरेंज सिटी स्ट्रिट, जयताळा, आयटी पार्क काटोल रोड, कळमना, पारडी, जुना भंडारा रोड, पाचपावली उड्डाणपूल, वर्धा मार्ग, बर्डी, नंदनवन आदी रस्त्यांवर जनता कर्फ्यूमुळे शुकशुकाट होता.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur closed due to janta cuefew