पोलिस कर्मचाऱ्याने घेतला युवतीचा गैरफायदा... ते व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी

crime
crime

नागपूर : नागपूर पोलिस दलात कार्यरत असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याने युवतीला पोलिस क्‍वॉटर्समध्ये नेऊन बलात्कार केला. या प्रकरणी युवतीने तक्रार दिल्यानंतर दहा दिवसांनी गिट्टीखदान पोलिसांनी आरोपी पोलिस कर्मचाऱ्याविरूद्ध गुन्हा दाखल केला. आकाश सिद्धार्थ मनवार (रा. पोलिस मुख्यालय, क्‍वॉटर्स) असे आरोपीचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित 25 वर्षीय युवती संजना (बदललेले नाव) ही एमपीएससीची तयारी करीत असून तिची दोन वर्षांपूर्वी परीक्षा केंद्रावर आरोपी पोलिस कर्मचारी आकाश मनवार (मुख्यालय) याच्याशी ओळख झाली. युवतीचे दोन नातेवाईक पोलिस विभागात कार्यरत आहेत. त्या नातेवाईकांना आरोपी आकाश ओळखतो. त्यामुळे संजनाने आकाशवर विश्‍वास ठेवला.

आकाशने तिला अभ्यासात मदत करण्याचे आमिष दाखवले व तिचा मोबाईल क्रमांक घेतला. मोबाईलवरून चॅटिंग आणि फोन करीत तिच्याशी जवळिक वाढवली. तिला मे 2019 मध्ये पोलिस मुख्यालयात असलेल्या क्‍वॉटर्सवर बोलावले. तिला प्रेमाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यास दबाव टाकला. आकाशने तिच्यावर बळजबरी करीत बलात्कार केला.

दुसऱ्याच आठवड्यात त्याने पुन्हा क्‍वॉटर्समध्ये बोलावले. परंतु, संजनाने नकार दिला. त्याने लगेच लग्न करण्याचे आमिष दाखवून पुन्हा बलात्कार केला. तेव्हापासून तिच्यावर शारीरिक संबंध प्रस्थापित करताना मोबाईलने अश्‍लिल व्हिडीओ आणि फोटो काढत होता. वारंवार होत असलेल्या लैंगिक शोषणाला कंटाळून संजनाने गिट्टीखदान पोलिस ठाण्यात 7 मार्चला तक्रार दिली. या प्रकरणी डीसीपी विनीता साहू यांच्या निर्देशानुसार गिट्‌टीखदान पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. अद्याप आरोपीला अटक झाली नाही. 

अश्‍लिल व्हिडीओ व्हायरलची धमकी 
शारीरिक संबंध प्रस्थापित करताना पोलिस कर्मचाऱ्याने मोबाईलने फोटो आणि व्हिडीओ काढले. ते व्हिडीओ सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देऊन तिचे वारंवार लैंगिक शोषण करीत होता. त्याने काही अश्‍लिल फोटो प्रविण नावाच्या मित्राच्याही मोबाईलवर पाठविल्याचा आरोपी पीडित युवतीने केला आहे. 

पोलिसांच्या भूमिकेवर संशय 
पीडित संजना ही 7 मार्चला गिट्टीखदान पोलिस ठाण्यात तक्रार द्यायला गेली होती. मात्र, तिची तक्रार घेण्यात आली नाही. तिचा तक्रार अर्ज ठेवून घेतला आणि 12 दिवसांपर्यंत गुन्हा दाखल केला नाही. शेवटी संजनाने डीसीपी विनीता साहू यांची भेट घेतली आणि गिट्टीखदान पोलिसांचा प्रताप चव्हाट्यावर आणला. साहू यांनी तक्रारीची गांभीर्याने दखल घेतली. मात्र, तोपर्यंत आरोपी पोलिस कर्मचारी आकाशने अटकपूर्व जामीन मिळवला. त्यामुळे गिट्‌टीखदान पोलिसांच्या भूमिकेवर संशय निर्माण झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com