कंबरेवर बंदूक मिरवत फिरणं पडलं महागात, तरुणाला अटक

nagpur crime branch arrested man illegally have weapon
nagpur crime branch arrested man illegally have weapon

नागपूर : कमरेला पिस्तूल लावून मिरविण्याचा शौक पूर्ण करणारा हौशी युवक पोलिसांच्या हाती लागला. त्याच्याकडून पोलिसांनी पिस्तूल आणि एक बुलेट जप्त केली. अनमोल सिंह हरमित सिंह सलुजा (१८, बाबा बुद्धाजीनगर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

टेका नाका कामठी रोडवर एक युवक पिस्तूलसह फिरत असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस कर्मचारी सचिन आंधळे यांना मिळाली. गुन्हे शाखेच्या पथकाने टेका नाका परिसरात सापळा रचला. या सापळ्यात अनमोल सिंह हा फसला. त्याच्याकडून पोलिसांनी पिस्तूल आणि बुलेट जप्त केली. ही कारवाई रविवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास केली. अनमोलने मध्यप्रदेशातून पिस्तूल आणले होते. कमरेला पिस्तूल लावून तो फिरायला लागला होता. ही माहिती पोलिसांना मिळताच त्याला अटक केली. ही कारवाई गुन्हे शाखेचे डीसीपी गजानन राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय ओमप्रकाश भलावी, अंमलदार सचिन आंधळे. श्रीकांत सावळे, पंकज लांडे, हिमांशू ठाकूर यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com