
२००५ च्या निवडणुकीत दक्षिण नागपूर मतदारसंघातून त्यांचे वडील गोंविदराव वंजारी यांनी निवडणूक लढविली होती. ते विजयी देखील झाले होते. मात्र, आमदारकीची शपथ घेण्यापूर्वीच हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे त्याठिकाणी पोटनिवडणूक लागली होती.
नागपूर : नागपूर पदवीधर मतदारसंघातून महाविकासआघाडीचे उमेदवार अभिजित वंजारी तब्बल १८,७१० मतांनी निवडून आले. अभिजित वंजारी यांना ६१,७०१ मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे संदीप जोशी यांना ४२,९९१ मते मिळली. अभिजित यांच्या राजकीय कारकीर्दीमधील पहिलाच विजय आहे. यापूर्वी त्यांनी दोन विधानसभा निवडणुका, एक महापालिका निवडणूक लढविली होती. मात्र, त्यामध्ये त्यांना अपयश आले होते.
अभिजित वंजारी यांचा जन्म १० मे १९७३ रोजी झाला. त्यांनी नागपुरातून माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी एलएलबी केले. त्यांनी महाविद्यालयीन जीवनात १९८८ ते २००२ पर्यंत या काळात एनएसयूआयचे जनरल सेक्रेटरी म्हणून काम पाहिले. अभिजित वंजारी यांचे वडील गोंविदराव वंजारी आमदार होते. त्यामुळे त्यांनी पहिल्यांदा काँग्रेसचे उमेदवारीवर महापालिका निवडणूक लढविली. मात्र, त्यात त्यांना अपयश आले.
भाजपला अंतर्गत धुसफूस भोवली? आघाडीच्या चक्रव्युव्हात अडकली
२००५ च्या निवडणुकीत दक्षिण नागपूर मतदारसंघातून त्यांचे वडील गोंविदराव वंजारी यांनी निवडणूक लढविली होती. ते विजयी देखील झाले होते. मात्र, आमदारकीची शपथ घेण्यापूर्वीच हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे त्याठिकाणी पोटनिवडणूक लागली होती. मात्र, काँग्रेसकडून अभिजित वंजारी यांना तिकीट नाकारण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून ही पोटनिवडणूक लढविली होती.
यावेळी त्यांना १९ हजार १५३ मते मिळाली होती. पण त्यातही अपयश आले. त्यानंतर ते परत काँग्रेसमध्ये आले. त्यांनी २०१४ मध्ये पूर्व नागपूर मतदारसंघातून विधानसबा निवडणूक लढविली होती. त्यामध्ये त्यांना ५० हजार ५२४ मते मिळाली. मात्र, ते विजयापासून दूर होते.
भाजपचा बालेकिल्ला ढासळणार! महाआघाडीचा विजय...
अभिजित वंजारी यांनी भूषविलेली पदे
नागपुरात महाविकास आघाडीने भाजपच्या बालेकिल्ल्याला...
अभिजीत वंजारी यांना मिळालेला पुरस्कार
संपादन - नीलेश डाखोरे