ठरलं...यंदा उपराजधानीत मिरवणुकीशिवाय होणार गणरायाचे आगमन, विसर्जन

in nagpur, Lord Ganesh festival will take place without a procession
in nagpur, Lord Ganesh festival will take place without a procession

नागपूर : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर दरवर्षीप्रमाणे उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्याचे टाळण्यात येणार आहे. यंदा गणरायाचे आगमन तसेच विसर्जनादरम्यान मिरवणूक टाळण्याचे आवाहन महापौर संदीप जोशी यांनी केले. गणेशोत्सव 'आरोग्योत्सव' म्हणून साजरा करण्याचेही आवाहन त्यांनी केले. 

गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीनिमित्त महापौर संदीप जोशी यांच्या अध्यक्षतेत महापालिकेत बैठक घेण्यात आली. याप्रसंगी उपमहापौर मनीषा कोठे, स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, प्रतोद दिव्या धुरडे, दहाही झोनचे सभापती, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अतिरिक्त आयुक्त संजय निपाने, उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन डॉ. प्रदीप दासरवार यांच्यासह सर्व झोनचे सहायक आयुक्त उपस्थित होते.

22 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवासंबंधी येत्या 20 जुलैपर्यंत महाराष्ट्र शासनाचे दिशानिर्देश जारी होतील. मात्र कोव्हिडची सद्याची स्थिती पाहता शहरवासीयांनी काळजी घेणे गरजेचे आहे. शक्‍यतो सार्वजनिक गणेशोत्सव टाळावे. या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या ठिकाणी आरोग्योत्सव साजरा करण्यात यावे. आजच्या परिस्थितीशी निगडीत जनजागृती करणारे आरोग्याबाबत दक्ष करणारे कार्यक्रम घेण्यात यावे, असेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाप्रमाणेच शहरात कोणत्याही गणेशमूर्ती चार फूट पेक्षा जास्त उंचीच्या नसाव्यात. उत्सव साजरा करताना 50 लोकांपेक्षा जास्त जणांची उपस्थिती नसावी. सर्व ठिकाणी सोशल डिस्टंसिंगचे पालन व्हावे, सर्वांनी मास्क लावावे, हॅंड सॅनिटायजरचा वापर करावा असे नमुद करीत गणेश मूर्तींचे विसर्जनही कृत्रिम तलावातच करायचे आहे, असेही महापौर म्हणाले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com