दशक्रियेला जाताना उभ्या ट्रकवर धडकली कार ...मग 

nagpur accident
nagpur accident

नागपूर : दशक्रियेच्या कार्यक्रमासाठी जात असलेली कार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर धडकली. या धडकेत कारमधील वृद्ध व महिला गंभीर जखमी झाले. दोघांपैकी वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी आरोपी ट्रकचालकाविरूद्ध वाठोडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बाळकृष्ण रामचंद्र भोयर (वय 82, रा. दत्तवाडी) असे अपघातात मृत्यू पावलेल्या वृद्धाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोयर यांच्या नातेवाईकाचा 8 मार्चला सकाळी साडेदहा वाजता मृत्यू झाला होता. नातेवाईकाच्या दशक्रियेच्या कार्यक्रमासाठी 18 मार्चला बाळकृष्ण भोयर, शिला माधव भोयर (वय 51) हे कुटुंबीयांसह कारने जात होते. वाठोडा परिसरातील तरोडीकडून फोर लाईन दाभा-जबलपूर मार्गावरून जात असताना रस्त्याच्या कडेला एक ट्रक उभा होता. भरधाव कार उभ्या ट्रकवर धडकली. त्यामुळे कारमध्ये बसलेले शीला आणि बाळकृष्ण हे दोघेही गंभीर जखमी झाले होते. दोघांनाही खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादम्यान आज दोन एप्रिलला बाळकृष्ण यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी वाठोडा पोलिसांनी आरोपी ट्रकचालकाविरूद्ध गुन्हा दाखल केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com