'रेमडिसिव्हर'ची किंमत निर्धारित करा, महापौरांचे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना पत्र

nagpur mayor wrote letter to health minister rajest tope regarding remdesivir
nagpur mayor wrote letter to health minister rajest tope regarding remdesivir

नागपूर : कोरोनावरील उपचारात रेमडिसिव्हर इंजेक्शन आवश्यक आहे. परंतु सद्यःस्थितीत या इंजेक्शनची टंचाई भासत असून काळाबाजार होत असल्याची शंका महापौर दयाशंकर तिवारी यांनी व्यक्त केली. त्यामुळे या इंजेक्शनची किंमत निर्धारित करण्यात यावी, अशी विनंती महापौर दयाशंकर तिवारी यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे पत्राद्वारे केली. 

रेमडिसिव्हरची किंमत सध्या १३०० रुपयांच्या आसपास आहे. टंचाईमुळे काळ्याबाजारात ती पाच ते सात हजार रुपयांना विकत घ्यावी लागत आहे. या इंजेक्शनची किंमत निर्धारित करण्यात आली तर सामान्य लोकांना इंजेक्शन सहज उपलब्ध होईल, असेही महापौर तिवारी यांनी पत्रात नमुद केले आहे. ज्याप्रमाणे मास्क आणि सॅनिटायझरची किंमत निर्धारित करून सर्व देशवासीयांना मदत करण्याचे कार्य केले, त्याचप्रमाणे या जीवनावश्यक इंजेक्शनची किंमत निर्धारित करून सामान्यांना आणि रुग्णांना दिलासा द्यावा, असेही महापौर तिवारी यांनी पत्रात म्हटले आहे. 

डॉक्टरांनीही सामान्यांना दिलासा द्यावा 
सध्या कोरोनाबाधिताच्या उपचारासाठी वापरले जाणाऱ्या औषधाची किंमत चार हजारांवर आहे. यात ८०० ते ९०० रुपयांची औषधही उपलब्ध आहे. त्यामुळे डॉक्टरांनी सर्व सामान्य रुग्णांचा विचार करून त्यांना झेपेल अशा कमी किमतीच्या औषधी लिहून द्याव्यात आणि सामान्यांना या कोव्हिडकाळात दिलासा द्यावा, असे आवाहन सुद्धा महापौरांनी केले. शुक्रवारी त्यांनी दूरध्वनी वर जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांचेशी चर्चा करून त्यांना सुद्धा रेमडिसिव्हरची किंमत निर्धारित करण्याची कार्यवाही करावी अशी सूचना केली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com