esakal | नागपूर महापालिकेचा २,७३१ कोटींचा अर्थसंकल्प सादर
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur Municipal Corporation budget presented

ऑनलाईन पद्धतीने प्रथमच अर्थसंकल्प सादर करण्यात आला. त्यामुळे झलके ऑनलाईन प्रणालीने अर्थसंकल्प सादर करणारे पहिले स्थायी समिती अध्यक्ष ठरले. अर्थसंकल्पात झलके यांनी पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्यावर भर दिला.

नागपूर महापालिकेचा २,७३१ कोटींचा अर्थसंकल्प सादर

sakal_logo
By
राजेश प्रायकर

नागपूर : महापालिकेचा कोव्हिडमुळे रेंगाळलेला अर्थसंकल्प मंगळवारी स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके यांनी सभागृहात सादर केला. २०२०-२१ या वर्षासाठी झलके यांनी २,७३१ कोटींचे अंदाजपत्रक सादर केले. नव्या कुठल्याही योजनांचा मोह टाळत झलके यांंनी जुन्याच योजना पुढे नेण्यावर भर दिला. यात आरोग्य, शिक्षण, रस्ते, पायाभूत सुविधांचा समावेश आहे.

दरवर्षी साधारणपणे जूनमध्ये सादर होणारा अर्थसंकल्प सादर करण्यास यंदा ऑक्टोबर उजाळले. कोरोनामुळे सादर करण्यास विलंब झाल्याने अंमलबजावणीलाही कमी कालावधी मिळणार आहे. त्यामुळे आकडेवारी फुगविण्याची परंपरा सोडून झलके यांनी वास्तवावर भर दिला. मार्चमध्ये तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी २,५४७ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला होता. त्यात केवळ १८४ कोटींची अधिकची अपेक्षा झलके यांनी केली.

सविस्तर वाचा - घरात अचानक जाणवू लागली प्रचंड उष्णता; कारण कळताच कुटुंबाने पहिल्या माळ्यावरून घेतल्या उड्‌या

ऑनलाईन पद्धतीने प्रथमच अर्थसंकल्प सादर करण्यात आला. त्यामुळे झलके ऑनलाईन प्रणालीने अर्थसंकल्प सादर करणारे पहिले स्थायी समिती अध्यक्ष ठरले. अर्थसंकल्पात झलके यांनी पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्यावर भर दिला.

शहराला अतिक्रमणमुक्त करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. स्मार्ट सिटी प्रकल्पात स्मार्ट हॉकर्स झोन तयार करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले. महापालिकेच्या स्वतंत्र पोलिस स्टेशनचा संकल्पही त्यांनी जाहीर केला. एकूणच जुन्या योजनांना नव्याने पुढे आणण्यात आले आहे.

संपादन - नीलेश डाखोरे