लज्जास्पद, उपराजधानी दुसऱ्या क्रमांकावर; काय असावे कारण?

अनिल कांबळे
Friday, 27 December 2019

पोलिसांच्या हाती विदर्भातील सर्वांत मोठा दलाल सचिन सोनारकर आणि रऊफ खान, अली, इरमान खान, मोना, अर्चना, सोहेल, जे. प्रणिता, अजय, बबलू, बेबीबाई, प्रतिभा हे लागले आहेत. अटक केलेल्या 280 दलालांमध्ये 80 टक्‍के महिला आरोपी असून, त्यांनी 12 ते 16 या वयातील अनेक मुलींना देहव्यापारात ओढल्याचे स्पष्ट झाले आहे. 

नागपूर : राज्यातील टॉप फाइव्ह "सेक्‍स रॅकेट'च्या यादीत मुंबईनंतर नागपूर शहराचा समावेश झाला आहे. नागपूर पोलिसांनी गेल्या पाच वर्षांत 117 ठिकाणी छापे घालून 280 पुरुष व महिला दलालांना अटक केली. तसेच 202 तरुणींना देहव्यापाराच्या दलदलीतून बाहेर काढले. यामध्ये अवघ्या 12 ते 14 वर्षे वयोगटातील मुलींचाही समावेश आहे. 

सविस्तर वाचा - Video : या देशातही आहे ब्रुसली, वय वर्ष अवघे पाच

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेणारी बदनाम वस्ती गंगाजमुना नागपूर शहरात आहे. यासह शहरात शंभरपेक्षा जास्त ठिकाणी आंबटशौकिनांना मौजमजेसाठी अल्पवयीन मुलींसह युवतींना पुरविण्यात येते. यामध्ये काही फार्महाउस, मसाज पार्लर, ब्युटी पार्लर, पंचकर्म सुविधा, मोठमोठे हॉटेल्स, बिअरबार, लॉज, निसर्गोपचार केंद्र, ऑर्केस्ट्रा-नाइट्‌स आणि विशेष पार्ट्यांमध्ये "सेक्‍स रॅकेट्‌स'चे दलाल मुलींना पुरवितात. यासह शहरातील पॉश परिसरात देहव्यापाराचे मोठमोठे अड्डे सुरू आहेत. अशा सेक्‍स रॅकेटमध्ये 12 वर्षांपासून ते 40 वर्षे वयांच्या मुली-महिलांकडून देहव्यापार करवून घेतला जात आहे. 

हेही वाचा - तो पंचावन वर्षांचा ती नऊ वर्षांची अन्‌...

गुन्हे शाखेने शहरात टाकलेल्या छाप्यांमध्ये रशियन मुलींनाही ताब्यात घेतले आहे. तसेच बांगलादेशी मुलींनाही देहव्यापारासाठी करार करून नागपुरात बोलविले जाते. इंटरनेटवरून सुरू असलेल्या काही सेक्‍स रॅकेटवर पोलिसांनी छापे घातले आहेत. यामध्ये मुंबई, पुणे, नांदेड येथील मुलींना देहव्यापार करताना ताब्यात घेतले होते. पोलिसांच्या हाती विदर्भातील सर्वांत मोठा दलाल सचिन सोनारकर आणि रऊफ खान, अली, इरमान खान, मोना, अर्चना, सोहेल, जे. प्रणिता, अजय, बबलू, बेबीबाई, प्रतिभा हे लागले आहेत. अटक केलेल्या 280 दलालांमध्ये 80 टक्‍के महिला आरोपी असून, त्यांनी 12 ते 16 या वयातील अनेक मुलींना देहव्यापारात ओढल्याचे स्पष्ट झाले आहे. 

No photo description available.

अन्य राज्यांतील मुलींना पसंती

देहव्यापारासाठी काश्‍मीर, दिल्ली, पश्‍चिम बंगाल, राजस्थान, मध्य प्रदेश आणि गुजरातच्या मुलींना नागपुरात पसंती दिली जाते. आतापर्यंत घातलेल्या छाप्यात अन्य राज्यांतील 17 ते 25 वयोगटांतील मुलींना ताब्यात घेण्यात आले होते. यासोबतच मुंबईत मॉडेल म्हणून काम करणाऱ्या एका युवतीलाही पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तसेच मुंबईत मालिका, जाहिराती आणि अल्बममध्ये काम करणाऱ्या मॉडेल्सनाही अटक करण्यात आली आहे. 

No photo description available.

दोन्हीकडून शोषणच

देहव्यापारासाठी दलाल नागपुरात करार पद्धतीने बोलावून घेतात. त्यांना महिन्याकाठी विशिष्ट रक्‍कम दिली जाते. आंबट शौकिनांनी दिलेल्या टिपवर त्यांची गुजराण होते. दलाल ग्राहकांकडून तीन ते पाच हजार रुपये तासाप्रमाणे वसुलतो. युवतीला मात्र केवळ 300 ते 700 रुपये मिळतात. युवतींना दिवसाला दहापेक्षा जास्त ग्राहकांना "खूश' करावे लागते. त्यामुळे ग्राहकासह महिला दलालही तिचे आर्थिक शोषण करतात. 

शहरात बारगर्ल्सचा धिंगाणा

शहरातील काही बिअरबारमध्ये संगीत, ऑर्केस्ट्राच्या नावावर डान्सबार सुरू असल्याची चर्चा आहे. येथे मुंबई आणि पुण्याच्या बारगर्ल्स आणण्यात आल्या आहेत. पोलिस निरीक्षकांना आणि गुन्हे शाखेला "सेट' करून बिनधास्तपणे डान्सबारमध्ये मुलींना कमी आणि पारदर्शक कपडे घालून नाचविले जात आहेत. त्यांच्यावर रात्रीतून लाखो रुपये उडविणाऱ्यांचीही कमी नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nagpur is second in the sex racket