गाळा रिकामा करण्यावरून घरमालकाशी वाद; भाडेकरूचा झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्येचा प्रयत्न

In Nagpur, a tenant attempted suicide
In Nagpur, a tenant attempted suicide

नागपूर : गाळा रिकामा करण्यावरून घरमालक व भाडेकरू यांच्यात वाद निर्माण झाला आहे. घरमालकाच्या तक्रारीवरून अंबाझरी पोलिसांनी भाडेकरूविरुद्ध खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर भाडेकरूने झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. साहील ऊर्फ लालचंद विरभान मोटवानी (३२, रा. मॅजेस्टिक हाईट अपार्टमेंट) असे भाडेकरूचे नाव आहे.

लेंड्रापार्क, रामदासपेठ येथील रहिवासी पंकज प्रफुल्लकुमार भंसाळी (४८) यांची अंबाझरी ठाण्याच्या हद्दीतील सुकराम अपार्टमेंटमध्ये सदनिका आहे. ही सदनिका त्यांना काही वर्षांपूर्वी साहील आप्टीकलचे मालक साहील ऊर्फ लालचंद विरभान मोटवानी यांना यांना भाड्याने दिली होता. भाडे व सदनिका रिकामे करण्यावरून त्यांच्यात वाद सुरू झाला.

टाळेबंदीदरम्यान सदनिकेत छापा टाकून पोलिसांना अवैध दारू पकडली होती. यात साहिलला आरोपी करण्यात आले. त्यानंतर या प्रकरणात खंडणीखोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दुसऱ्याच दिवशी साहिलने झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. साहिलने गोळ्या घेण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली आहे.

मानकापूर चौकात अपघात; एक ठार

हरनुरसिंग इंद्रपालसिंग भाटिया (२१, रा. देवरी, जि. गोंदिया) याच्या मित्राने अपघात झालेली होंडा सिवीक कार सेकंडहॅंड खरेदी केली होती. दुरुस्तीसाठी तीन मित्र कारमधून नागपूरला येत होते. हरनुरसिंग वाहन चालवीत होता. मानकापूर चौकात सिग्नल बंद असल्याने वाहने उभी होती. योगेंद्रनगर, नर्मदा सोसायटी, बोरगाव येथील रहिवासी अज्जू ऊर्फ नवीन अवधेश सिंग ठाकूर हे आपल्या फॉरच्युनर कारमध्ये सिग्नल सुरू होण्याची वाट बघत होते.

हरनुरसिंगला गतीचा अंदाज आला नाही. ऐनवेळी त्याने गाडीचे ब्रेक दाबले पण कार मागून समोर उभ्या फॉरच्युनरवर धडकली. यात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. तर हरनुरसिंगचा घटनास्थळीच मृत्यू झाला. याप्रकरणी मानकापूर पोलिसांनी हरनुरसिंगवरच स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com