नागपूर विद्यापीठाची ऑनलाईन परीक्षा उद्यापासून, विद्यार्थ्यांच्या तक्रारी कायम

file photo
file photo

नागपूर ः राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा उद्या गुरुवारपासून सुरू होत आहे. ‘आरटीएमएनयू परीक्षा‘ ॲपच्या माध्यमातून ऑनलाइन परीक्षा घेण्यात येणार आहे. मात्र, अद्यापही विद्यार्थ्यांच्या तक्रारी कायम असल्याने विद्यापीठाच्या परीक्षेचीच परीक्षा असल्याचे समजते. याउलट विद्यापीठाकडून परीक्षेसाठी तयारी पूर्ण झाल्याचे सांगण्यात येत आहे.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर विद्यापीठाने परीक्षा घेण्याची तयारी सुरू केली. यानुसार १ ऑक्टोबरपासून परीक्षा घेण्याची घोषणा करण्यात आली. मात्र, अचानक विद्यापीठ आणि महाविद्यालयीन शिक्षकांनी आंदोलनाचे अस्त्र उगारल्याने परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यात. उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यानंतर परीक्षा ८ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान घेण्याचे ठरले. त्यानुसार उद्या सकाळी साडेनऊ ते साडेचारदरम्यान २२ विषयांचे पेपर घेण्यात येईल.

मात्र, ॲपसंदर्भातील समस्या अद्यापही सुटल्या नसल्याचे चित्र आहे. याबाबत विद्यापीठाच्या परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांचेशी संपर्क केला असता त्यांनी विद्यार्थ्यांच्या संपूर्ण समस्या सोडविण्यात आलेल्या आहेत. परीक्षेची तयारीही जवळपास पूर्ण झाली असल्याचे ते म्हणाले.

मात्र, वेळेवर काही तांत्रिक अडचण आल्यास विद्यार्थ्यांना संपर्क करण्यासाठी हेल्पलाईन आणि इतर क्रमांक देण्यात आले आहे. याशिवाय ॲपवर ‘युजर मॅन्युअल'चे विद्यार्थ्यांना वाचन करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. विशेष म्हणजे परीक्षेदरम्यान, ‘अॅप' विद्यार्थ्यांचे ऑडिओ-व्हिडिओ रेकॉर्ड करणार असल्याच्या दावा विद्यापीठाने केला आहे. विद्यापीठाची दक्षता समिती अशा विद्यार्थ्यांबाबत योग्य निर्णय घेईल, तेव्हा कुणीही गैरप्रकाराला बळी पडू नये असे आवाहन विद्यापीठाने केले आहे.

चार टप्प्यात होणार पेपर
- सकाळी ९.३० ते १०.३० वाजता वाणिज्य शाखेचे पेपर
-सकाळी ११.३० ते१२.३० या कालावधीत आंतरविद्याशाखा व मान्यव्यविद्या शाखा यांचे पेपर
-दुपारी १.३०ते २.३० वाजतादरम्यान विज्ञान शाखेचे पेपर
- दुपारी ३.३० ते ४.३० वाजतादरम्यान अभियांत्रिकी व तंत्रज्ञान शाखेचे पेपर

या आहेत सूचना

  • परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी फक्त अँड्रॉईड मोबाईलवर ‘आरटीएमएनयू परीक्षा‘ ॲप डाऊनलोड करावे
  • परीक्षा सुरू करण्यासाठी, योग्य लॉगिन आणि पासवर्ड वापरावा, लॉगिन केल्यावर नोंदणीकृत मोबाइल नंबरवरच ओटीपी मिळेल.
  • एमसीक्यू पद्धतीने परीक्षा असून प्रत्येक प्रश्नासाठी चार पर्याय देण्यात येतील. त्यापैकी एक अचूक पर्याय निवडावा लागेल.
  • एक तासात पन्नास प्रश्नांपैकी २५ प्रश्न सोडवावे लागतील. प्रत्येक प्रश्नाला २ गुण देण्यात येतील. निगेटीव्ह मार्कींग करण्यात येणार नाही.
  • सर्वच प्रश्न मोबाईल स्क्रीनवर दिसतील, त्यामुळे कुठलाही प्रश्न अगोदर सोडविता येणार.
  • नमूद केलेल्या परीक्षा योजनेनुसार प्रश्नाची भाषा येईल.
  • संकेतस्थळावर दिलेल्या वेळापत्रकानुसार परीक्षा घेण्यात येईल. त्यासाठी विद्यार्थ्यांनी वेळापत्रक काळजीपूर्वक वाचावे. याशिवाय दिलेल्या सूचनाही वाचाव्यात.

येथे करता येईल संपर्क

  • हेल्पलाईन क्रमांक : ८०१०५१०८६५, ८०१०५२३८०८, ८०१०५८१६८४.
  • ई-मेल - rtmnuparikshahelp@gmail.com
  • व्हॉट्सॲप क्रमांक - ८६६९९५५३७६
  • आकस्मिक संपर्क क्रमांक - डॉ. नविन मुंगळे - ९५११९१०५७५२, मोतीराम तडस - ७७२२०३६६००, धन्नुसिंग पवार - ७७९८१३५८५९, बिंदूप्रसाद शुक्ला-९८६०४८२०२१, गोविंद अकोटकर - ९४०५८९८४१६, सतिश मुरमारे - ९५९५४९१०७१, डॉ. प्रफुल्ल साबळे - ७९७२८२६६२८.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com