प्रियकराचा जीव वाचविण्यासाठी प्रेयसीने फोडला हंबरडा... पण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

प्रणयने फोन करून चौदामैल येथे भाड्याच्या खोलीत बोलावून घेतले. त्याचा स्वभाव संशयी होता. त्याने प्रेयसीला इतर कोणाशीही बोलण्यास मनाई केली होती. या कारणावरूनच दोघांतील शाब्दिक वाद विकोपाला पोचला. रागाच्या भरात प्रणयने दुपारी साडेचारच्या सुमारास लोखंडी तार गळ्याला बांधून पंख्याला लटकला.

धामणा (लिंगा) (जि. नागपूर) : अमरावती ते नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्र.सहावरील चौदामैल येथे बुधवारी (ता.12) तरुणाने प्रेयसीसमोरच गळफास घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली. परंतु, तपासात त्याने मृत्यूपूर्वी आईच्या नावे लिहिलेले पत्र पोलिसांना आढळल्यामुळे प्रणयच्या मृत्यूमागचे वलय आणखी गूढ होत चालले आहे. 

कळमेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चौदामैल येथे सुनील बोरकर यांच्या घरी तिसऱ्या माळ्यावर किरायाने राहणारा प्रणय देवीदास मोरे (वय 26, रा. वर्धा) हा परिसरातील उडाण कंपनीत कामाला होता. 

 

Image may contain: 1 person, selfie and closeup
प्रणय मोरे

प्रणयचे वर्धा येथील एका तरुणीसोबत किमान दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. काही दिवसांपूर्वी तरुणी लखनौ (उत्तर प्रदेश) येथे गेली होती. तिला प्रणयने फोन करून चौदामैल येथे भाड्याच्या खोलीत बोलावून घेतले. त्याचा स्वभाव संशयी होता. त्याने प्रेयसीला इतर कोणाशीही बोलण्यास मनाई केली होती. या कारणावरूनच दोघांतील शाब्दिक वाद विकोपाला पोचला. रागाच्या भरात प्रणयने दुपारी साडेचारच्या सुमारास लोखंडी तार गळ्याला बांधून पंख्याला लटकला. प्रेयसीने त्याला वाचवण्याचा बराच प्रयत्न केला. परंतू त्यात ती अयशस्वी ठरली. आरडाओरड करत तिने हंबरडा फोडला. परंतु, परिसरातील नागरिक गोळा होईस्तोरवर वेळ निघून गेली. 

काही झालं तरी, आम्ही प्रेमविवाह करणार नाही म्हणजे नाही...

मृत्यूपूर्वी प्रणयने लिहिले होते आईच्या नावे पत्र 
प्रेयसीने घटनेची माहिती कंपनीत फोनद्वारे कळविली. कंपनीतर्फे कळमेश्वर पोलिस ठाण्यात माहिती दिल्यानंतर लगेच घटनास्थळी पोलिस दाखल झाले. प्राप्त माहितीनुसार पोलिसांनी तपासणी केली असता पोलिसांना प्रणयने मृत्यूपूर्वी आईच्या नावे चारपानी पत्र लिहून ठेवल्याचे आढळले. यात त्याने आईला उद्देशून लिहिले की, आई, मला तू मनाई केली होती. परंतु, मी ऐकले नाही' या आणि अनेक गोष्टींचा उल्लेख त्याने पत्रात केल्याची बाब पोलिसांच्या तपासात आढळली. पोलिसांनी प्रणयला कळमेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ आणले असता उपचारादरम्यान वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.

शिवभक्तांनो, पचमढी यात्रेला जाताय? जाणून घ्या बसचे वेळापत्रक

प्रेयसीसमोर घेतला गळफास
याप्रकरणी कळमेश्वर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास कळमेश्वरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मारुती मुळूक यांच्या मार्गदर्शनात एएसआय निरंजन गवई, हेडकॉंस्टेबल प्रकाश उईके, पवन वाघमारे तपास करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur youth love story ends in valentines week