नागपूरकर श्‍वेताच्या लघुपटाची शांघायपर्यंत धुम

 Nagpurkar Shweta's short film collection to Shanghai
Nagpurkar Shweta's short film collection to Shanghai

नागपूर  : नागपूकर श्‍वेता कामत हिने संकलित (एडिट) केलेल्या "सालाना जलसा' या मराठी लघुपटाची शांघाय येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड झाली आहे. या निवडीने शहराचा शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. सत्यजित रे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटतर्फे निर्मित हा लघुपट 26 ते 31 जुलैदरम्यान शांघाय येथील चित्रपटगृहात प्रदर्शित केला जाणार आहे. लघुपट प्रकारातील देशातून निवड झालेला हा लघुपट आहे.

श्‍वेताचे वडील उदय कामत व्यावसायिक आहेत. श्‍वेताने सिव्हिल लाईन्स येथील भारतीय विद्या भवन शाळेतून शिक्षण घेत बिट्‌स पिलानी येथून कॉम्प्यूटर सायन्स हा अभ्यासक्रम पूर्ण केला. यानंतर तिने दोन वर्ष नोकरी केली. मात्र, नोकरीऐवजी आवडीला प्राधान्य देत सत्यजित रे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला. यातूनच तिने हे यश प्राप्त केले.

"सालाना जलसा' या मराठी लघुपटाचे दिग्दर्शन प्रतिक ठाकरे यांचे असून, प्रमुख भूमिकेत अनिरुद्ध देवधर, अंकीता निकराड आणि श्रीधर कुलकर्णी असून सिनेमॅटोग्राफर सर्वानामरुथु एस., संगीत व ध्वनी मोहीत शंकर, कार्यकारी निर्माता म्हणून रुचिका गुप्ता आणि कुणाल अहिरराव यांनी काम पाहिले. लघुपटाचे चित्रिकरण कोल्हापुरात जानेवारी महिन्यात पूर्ण करण्यात आले.

नऊ चित्रपटांची निवड
शांघाय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात एकूण नऊ चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. यात दिग्दर्शक अनुभव सिन्हाचा "आर्टिकल 15', अजय बहल यांचा "सेक्‍शन 375', प्रकाश झा यांचा "परीक्षा', अनुराग कश्‍यप निर्मित आणि आरती कडव दिग्दर्शित "कार्गो', गीतांजली राव यांच्या ऍनिमेटेड चित्रपट "बॉम्बे रोज', इंद्रनील रॉय चौधरी यांचे "मायार जोंजल'(डेब्रिज ऑफ डिझायर), रजत कपूर यांचा "आरके-आर.के.' आणि गौतम घोष यांचा "राहगीर'(द वेफेयरर्स) आणि "सालाना जलसा' या मराठी लघुपटाचा समावेश आहे. इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फिल्म प्रोड्यूसर असोसिएशनच्या (एफआयएपीएफ) क्रमवारीत पहिल्या 15 फेस्टिवलमध्ये शांघायसह कान, बर्लिन आणि व्हेनिसचा समावेश आहे. श्‍वेताने ही भरारी घेत नागपूरच नव्हे तर महाराष्ट्राची मान उंचावली आहे.

मिळालेल्या यशाबद्दल अतिशय आनंदी आहे. मराठी चित्रपटाला जागतिक पातळीवर या लघुपटामुळे स्थान मिळत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रदर्शनाची संधी मिळणे ही मोठीच गोष्ट आहे.
- श्‍वेता कामत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com