जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदासाठी सलील देशमुखांचे नाव आघाडीवर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 जानेवारी 2020

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत कॉंग्रेसला 30, तर राष्ट्रवादीला 10 जागा मिळाल्या आहेत. त्यानुसार जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद कॉंग्रेसकडे तर उपाध्यक्षपद राष्ट्रवादीकडे गेले आहे. उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीमधून सलील देशमुख रेसमध्ये आहे.

नागपूर : भाजपचा पराभव करीत कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीला जिल्हा परिषद निवडणुकीत मोठे यश मिळाले आहे. दुसरीकडे वडील अनिल देशमुख हे राज्याचे गृहमंत्री झाल्यानंतर जिल्ह्यात सलील देशमुख यांचे वजन आपोआपच वाढले आहे. नागपूर जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षाची निवड शनिवारी (ता. 18) होणार आहे. उपाध्यक्षपदासाठी सलील देशमुख यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याचे समजते. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जातीतील महिलांसाठी राखीव आहे.

सविस्तर वाचा - राज्याच्या गृहमंत्र्यांचे वाहन महामार्गावरून गेले आणि घडले हे...वाचा

सलील देशमुख हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा विदर्भातील तरुण चेहरा आहे. त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी येणवा सर्कलमधून अर्ज मागे घेतला होता. यानंतर त्यांनी मेटपांजरा सर्कलमधून निवडणूक लढविली. मेटपांजरा सर्कलमधून चार हजार 397 मतांनी ते विजयी झाले. अनिल देशमुख यांनी गृहमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आठवड्याभरात देशमुख कुटुंबात डबल धमाका झाला होता. आता जिल्हा परिषद उपाध्यक्ष पदाच्या रेसमध्ये त्यांचे नाव आघाडीवर आहे. 

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत कॉंग्रेसला 30, तर राष्ट्रवादीला 10 जागा मिळाल्या आहेत. त्यानुसार जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद कॉंग्रेसकडे तर उपाध्यक्षपद राष्ट्रवादीकडे गेले आहे. उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीमधून सलील देशमुख रेसमध्ये आहे. राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांचीही सलील देशमुख यांच्या नावाला पसंती आहे. त्यामुळेच सध्या तरी नागपूर जिल्हा परिषद उपाध्यक्षपदासाठी सलील देशमुख यांचे नाव आघाडीवर मानले जात आहे. 

काय आहे बातमीत - छे छे... आम्ही संपूर्ण खर्च थोडी करणार! घोषणा हवेत

पहिल्यांदाज लढवली निवडणूक

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तिकिटावर मेटपांजरा येथून सलील देशमुख यांनी पहिल्यांदाज जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली होती. त्यांनी पहिल्याच निवडणुकीत घवघवीत यश संपादन केले. ते राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थापनेपासूनच पक्षात सक्रिय आहेत. याआधीही अनिल देशमुख यांनी मुलासाठी विधानसभा निवडणुकीचे तिकीट मागितले होते. पश्‍चिम नागपूर विधानसभा मतदारसंघासाठी देशमुख आग्रही होते. परंतु, विधानसभावारी हुकलेल्या सलील देशमुखांना जिल्हा परिषदेत झेंडा रोवण्यात यश आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Name of Salil Deshmukh for the post of Vice President of Zilla Parishad