राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याने केला सहकारी महिला कार्यकर्त्यावर अत्याचार

NCP worker tortured a woman worker
NCP worker tortured a woman worker

नागपूर : पाचपावली पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कर्यकर्ता सोहेल पटेल (५५, रा. जाफरनगर) याच्याविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. सहकारी महिला कार्यकर्त्यावर अत्याचार केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. चला तर जाणून घेऊया संपूर्ण प्रकार...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोहेल पटेल हा विवाहित आहे. त्याची २०१८ मध्ये पक्षाच्या कार्यक्रमातच विवाहित ४६ वर्षीय महिलेसोबत ओळख झाली. दोघांच्या भेटीगाठी वाढू लागल्या. महिला पक्षाची कार्यकर्ता असल्याने सोहेल नेहमी तिच्या घरी जायचा. सोहेल ओळखीचा असल्याने तिनेही कधी घरी येण्यास विरोध केला नाही.

एका कामानिमित्त जानेवारी २०१९ मध्ये सोहेल महिलेच्या घरी गेला. घरी कोणी नसल्याची संधी साधून त्याने महिलेवर अत्याचार केला. कोणाला काहीही सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली. बदनामीच्या भीतीपोटी महिला गप्प राहिली. यानंतर सोहेल महिलेला वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जायचा आणि अत्याचार करायचा. महिलेच्या तक्रारीवरून पाचपावली पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याविरुद्ध अत्याचारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून शोध सुरू केला आहे.

भंडारा, नागपुरात केला अत्याचार

एकाच पक्षात असल्याने सोहेलची पक्षातील महिलेसोबत ओळख झाली. यानंतर दोघांची भेटीगाठी होऊ लागल्या. चांगली मैत्री झाल्याने सोहेल महिलेच्या घरी जाऊ लागला. एकेदिवशी घरी कुणीही नसल्याची संधी साधून सोहेलने तिच्यावर अत्याचार केला. यानंतर तिला पक्षाचे काम असल्याचे सांगून बाहेर घेऊन जायचा आणि अत्याचार करायचा. सोहेलने महिलेवर भंडारा व नागपुरातील अन्य ठिकाणी अत्याचार केला.

लग्नाचेही आमिष

सोहेलने महिलेचा फायदा घेण्यासाठी लग्नाचे आमिष दाखवले. तिनेही त्याच्या बोलण्यावर विश्वास केला. यानंतर त्याने वारंवार तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. सततच्या शारीरिक संबंधाला कंटाळल्याने महिलेने पाचपावली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पाचपावली पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. सोहेल हा पसार असून, पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत.

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com