
अतुल सहारे (५८) असे मृत मामाचे तर विकास साखरे (३२) असे आरोपी भाच्याचे नाव आहे. सहारे व साखरे कुटुंब बारसेनगरच्या कुंभारपुऱ्यात आजूबाजूलाच राहतात.
नागपूर ः मद्यधुंद भाच्याने केलेल्या बेदम मारहाणीत मामाचा मृत्यू झाला. गुरुवारी रात्री बारसेनगरच्या कुंभारपुऱ्यात ही घटना घडली. याप्रकरणी पाचपावली पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करीत भाच्याला अटक केली.
अतुल सहारे (५८) असे मृत मामाचे तर विकास साखरे (३२) असे आरोपी भाच्याचे नाव आहे. सहारे व साखरे कुटुंब बारसेनगरच्या कुंभारपुऱ्यात आजूबाजूलाच राहतात. मामाभाचे दोघेही गुंडप्रवृत्तीचे असून काही वर्षांपूर्वी मामाने आपल्या भावाचाच खून केला असल्याची माहिती पुढे आली आहे. दारूच्या व्यसनाला कंटाळून अतूलची पत्नी फार पूर्वीच त्याला सोडून गेली होती.
आई-वडिलही त्याच्यापासून लांबच राहतात. राजेश नावाच्या ३३ वर्षीय मुलासोबत तो राहत होता. हातमजुरी करून मामाभाचे कुटुंबाचा गाडा हाकत असले तरी त्यांनी दारूचे जबर व्यसन होते. मामा-भाचे दोघेही सोबत दारू ढोसायचे. त्यानंतर एकमेकांशीच भांडायचे, बरेचदा एकमेकांना मारहाणही करायचे. सकाळी उठताच रात्रीचे भांडण विसरून पुन्हा सोबतच चहा घ्यायचे. हा नित्यक्रम असल्याने त्यांच्या भांडणाकडे कुणीही फारसे लक्ष देत नव्हते.
गुरुवारी रात्री दोघेही दारू ढोसून घरी परतले. त्यानंतर नेहमीप्रमाणे भांडणाला सुरुवात झाली. नेहमीचाच प्रकार वाटल्याने कुणीही फारसे लक्ष दिले नाही. विकासने मामाला शिवीगाळ करीत तोंडावर, पोट व छातीवर हातबुक्कीने मारहाण करीत खाली लोळविले. त्यानंतर पायाने अनेकदा तोंड व डोके ठेचले.
अधिक वाचा - आता धावत्या मेट्रोत साजरा करा समारंभ; अवघ्या तीन हजार रुपयांत होणार ‘ग्रॅन्ड सेलिब्रेशन
डोक्याला दुखापत झाल्याने मामाचा मृत्यू झाला. हालचाल थांबूनही आरोपीकडून मारहाण सुरूच होती. घटनेची माहिती मिळताच पाचपावली पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवीत आरोपीला अटक केली.
संपादन - अथर्व महांकाळ