नागपुरात कोरोनाचा विस्फोट! आज दिवसभरात आढळले तब्बल ११८१ रुग्ण; १० जणांनी गमावला जीव 

new 1181 corona patients in nagpur district today read full story
new 1181 corona patients in nagpur district today read full story

नागपूर ः नागपूर शहरात व ग्रामीण भागात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येत मागील आठवडाभरापासून घट होताना दिसत आहे. जिल्ह्यात भयावह स्थिती निर्माण झाली असून बुधवारी कोरोनाचा विस्फोट झाला. दिवसभरात ११८१ कोरोनाबाधित आढळले. तर दहा जणांचा बळी गेला. यात शहरातील ७ जणांचा समावेश आहे.

नागपुरात १५ ऑक्टोंबर २०२० रोजी ९८२ कोरोनाबाधित आढळून आले होते. यानंतर तब्बल चार-साडेचार महिन्यानंतर कोरोनाबाधितांचा आकडा एक हजार पार झाला. बुधवारी (ता.२४) आढळून आलेल्या १ हजार १८१ कोरोनाबाधितांपैकी ९५५ कोरोनाबाधित हे शहरातील आहेत. तर उर्वरित २२४ बाधित ग्रामीण भागातील आहेत. केवळ दोघे जण जिल्ह्याबाहेरचे आहेत. विशेष असे की, जिल्ह्यात दोन दिवसांपासून चाचण्यांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. मंगळवारी सुमारे ११ हजारांजवळ चाचण्या झाल्या. तर बुधवारी देखील १० हजार ५८४ चाचण्या झाल्या आहेत. 

दोन दिवसात २१ हजार चाचण्यांचा उच्चांक झाल्यामुळे नागपूर जिल्ह्यात १२ लाखाच्या उंबरठ्यावर चाचण्यांची संख्या पोहचली आहे. विदर्भात सर्वाधिक चाचण्या नागपूर जिल्ह्यात झाल्याची नोंद आहे. रुग्णांची संख्या रोडावल्याने अनेक खासगी रुग्णालयांनी कोरोना रुग्णालय बंद केली होती. मात्र बाधितांचा टक्का वाढताच अनेक रुग्णालये पुन्हा कोरोना रुग्णालये म्हणून वापर होत असल्याची माहिती पुढे आली आहे. जिल्ह्यात आता कोरोनाबाधितांची संख्या १ लाख ४५ हजार ७१५ वर पोहचली आहे. यातील १ लाख १६ हजार ३७५ रुग्ण हे शहरातील आहेत. तर उर्वरित २८ हजार ४०४ रुग्‍ण ग्रामीण भागातील आहेत. जिल्ह्याबाहेरच्या ९३२ रुग्णांची नोंद झाली आहे. 

मृत्यूचा टक्का आज शहरात वाढला आहे. यामुळे शहरातील मृत्यूची संख्या २ हजार ७८३ झाली तर ग्रामीण भागातील ७३८ मृत्यूंची नोंद झाली. जिल्ह्याबाहेरच्या ७५० मृत्यूसह जिल्ह्यात आतापर्यंत ४ हजार ३०१ मृत्यू झाले आहेत. या तुलनेत अवघे ४५५ कोरोनाबाधितांनी कोरोनावर मात केल्यामुळे कोरोनामुक्तांचा टक्का आपोआपच कमी झाला आहे. आतापर्यंत १ लाख ३४ हजार २३० जणांनी कोरोनावर मात केली आहे.

सक्रिय रुग्णांची संख्या ७ हजारावर

तीन आठवड्यापूर्वी दिवसांपूर्वी जिल्ह्यात सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या ३ हजारावर आली होती. परंतु कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कोरोनाच्या विषाणूंमुळे भयावह रुप धारण केले आहे. अलिकडे जिल्ह्यात ७ हजार १८४ सक्रिय कोरोनाबाधित असून त्यांच्यावर जिल्ह्यातील विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या मेडिकलमध्ये १२० तर मेयोत १०० कोरोनाबाधित दाखल आहेत. उर्वरित ८५७ कोरोनाबाधितांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गृहविलगीकरणातील रुग्णांची संख्या वाढत असून ती ४ हजार ८२६ वर पोहचली आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com