Corona Update: नागपुरात आज ३५३ रूग्णांची भर तर ९ जणांचा मृत्यू 

केवल जीवनतारे 
Wednesday, 20 January 2021

जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा पाहिजे तसा जोर नसला तरी दर दिवसाला कोरोनाचा दंश मात्र नागरिकांना बसत आहे. त्याच तुलनेत कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या बऱ्यापैकी आहे. दिवसभरात ३१० कोरोनाबाधितांनी बुधवारी कोरोनावर मात केली

नागपूर ः बुधवारी नव्याने ३५३ कोरोनाबाधितांची भर पडली. यामुळे आतापर्यंतचा बाधितांचा आकडा १ लाख ३१ हजार २५० वर पोहचला आहे. तर ९ बाधितांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंत बाधितांच्या मृत्यूची संख्या ४ हजार ९९ झाली आहे.

जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा पाहिजे तसा जोर नसला तरी दर दिवसाला कोरोनाचा दंश मात्र नागरिकांना बसत आहे. त्याच तुलनेत कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या बऱ्यापैकी आहे. दिवसभरात ३१० कोरोनाबाधितांनी बुधवारी कोरोनावर मात केली. यामुळे कोरोनावर मात करणाऱ्यांचा आकडा १ लाख २३ हजार ३१० झाला आहे. 

नक्की वाचा - जन्मदाता बापच करत होता घृणास्पद कृत्य; अखेर दिरानं उचलला विडा अन् घडला थरार

९ कोरोनाग्रस्तांनी जीव गमावला असून यात शहरातील ४, जिल्ह्याबाहेरच्या ४ आणि ग्रामीण भागातील १ जणांचा समावेश आहे. आज दिवसभरात ४ हजार २३१ जणांच्या चाचण्या झाल्या आहेत. यापैकी सर्वाधिक १५७५ चाचण्या या खासगी प्रयोगशाळेत झाल्या आहेत. यामुळे खासगीतून बाधितांची टक्कावारी अधिक दिसून येते. एम्समध्ये २१४ नमुने तपासण्यात आले. यापैकी केवळ ९ जण बाधित आढळले. 

मेडिकलमध्ये ४८९ जणांचे नमुने तपासले यापैकी ४३ जण बाधित आढळले. मेयो रुग्णालयात ९५४ जणांचे स्वॅब तपासले असता, ७८ जणांना बाधा झाल्याचे पुढे आले. २४ बाधित निरी, विद्यापीठाच्या प्रयोगशाळेतून २१ तर खासगीतून ९८जण बाधित आढळले आहेत. ॲन्टिजेन चाचणीतून ८० बाधित असल्याचे आढळून आले.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: new 359 corona patients in nagpur district today read full story