ही खास कॉफी पळवणार तुमचे टेन्शन...वाचा

प्रशांत रॉय 
रविवार, 16 फेब्रुवारी 2020

शेतकरी कुटुंब वर्षभर शेतात राबत असते. निसर्ग कधी धोका देईल याचा भरवसा नसतो. क्षणात वर्षभराची मेहनत वाया जाण्याचा धोका असतो. यासाठी पूरक उद्योगांकडे शेतकरी वळत आहे. विशेष म्हणजे, कुक्कुटपालन, दुग्धोत्पादन याव्यतिरिक्त अन्य व्यवसायांकडे अलीकडच्या काळात शेतकरी वळत आहे. शहरीकरणामुळे गावाकडील नैसर्गिक चवीच्या वस्तू, वनस्पती, रसायनमुक्त शेतीमालाचे आकर्षण लोकांमध्ये वाढत चालले आहे. अनेक दुर्लक्षित, परंतु औषधी गुणधर्माच्या वनस्पती कालौघात नाहीशा होत आहेत.

नागपूर : ऍसिडिटी, डोकेदुखीमुळे अनेकांना आवडत असूनही चहा, कॉफीपासून दूर राहावे लागते. वन्यप्राण्यांद्वारे शेतातील उभ्या पिकांचे मोठे नुकसान होते. यापासून दिलासा देण्यासाठी आता आली आहे तरोट्याची कॉफी आणि आवाज करणारी गन. शेतकरी भवन येथे ग्रामोन्नती महिला बचत गटांचे प्रदर्शन सुरू आहे. या प्रदर्शनात ठेवलेल्या विविध ग्राहकोपयोगी वस्तूंना नागरिकांची पसंती मिळत असून, तरोट्याची कॉफी आणि फटाका बंदूक विशेष आकर्षण आहे. 

याविषयी सुनंदा चरडे व कल्पना शेळके यांनी सांगितले की, शेतकरी कुटुंब वर्षभर शेतात राबत असते. निसर्ग कधी धोका देईल याचा भरवसा नसतो. क्षणात वर्षभराची मेहनत वाया जाण्याचा धोका असतो. यासाठी पूरक उद्योगांकडे शेतकरी वळत आहे. विशेष म्हणजे, कुक्कुटपालन, दुग्धोत्पादन याव्यतिरिक्त अन्य व्यवसायांकडे अलीकडच्या काळात शेतकरी वळत आहे. शहरीकरणामुळे गावाकडील नैसर्गिक चवीच्या वस्तू, वनस्पती, रसायनमुक्त शेतीमालाचे आकर्षण लोकांमध्ये वाढत चालले आहे. अनेक दुर्लक्षित, परंतु औषधी गुणधर्माच्या वनस्पती कालौघात नाहीशा होत आहेत. तरोटा ही अशीच एक वनस्पती. काही दशकांपूर्वी शेतशिवारासह कुठेही दिसायची.

तुमच्या मनात हा प्रश्न उद्भवतो का? मी नापास झालो तर!
 

कॉफीला शहरवासींची पसंती 
जुन्या जाणत्या लोकांना तिचे गुणधर्म माहीत होते. ते त्याचा योग्य वेळी उपयोग करीत असत. कालांतराने यावर अपेक्षेप्रमाणे संशोधन न झाल्यामुळे ही वनस्पती शहरी भागातून जवळपास नामशेष झाली आहे. परंतु शेतकऱ्यांना पिढ्यान्‌ पिढ्या याची माहिती आहे. डिजिटल जगाशी याची नाळ जुळवण्यासाठी काही बचत गटांनी एकत्र येत तरोट्यापासून कॉफी पावडर तयार करावी आणि त्याची विक्री करावी, असे ठरविले. महिलांना ही कल्पना आवडल्यामुळे त्यांनी तरोट्याच्या बिया भाजून त्यापासून कॉफी पावडर तयार केली आहे. विविध बचत गटांच्या प्रदर्शनात ही सेंद्रिय कॉफी ठेवली जात असून चवही चाखायला देतात. 

चालान करत होता वाहतूक पोलिस, अन् घडला विचित्र अपघात
 

मुंबईला तीन प्रदर्शनांत आम्ही तरोट्याची कॉफी विक्रीस ठेवली होती. मुंबईकरांनी त्यास चांगला प्रतिसाद दिला असून चांगली विक्री झाली. याशिवाय काही ऑर्डरही मिळाल्या आहेत. भविष्यात इंटरनेटद्वारे विक्री करण्याचाही मानस आहे. 
- सुनंदा चरडे, कल्पना शेळके 

 

सायलेन्सरपासून बनवली बंदूक 
माझा गॅस वेल्डिंगचा छोटासा व्यवसाय आहे. एकदा दुचाकीचे नादुरुस्त सायलेन्सर नीट करण्याचा प्रयत्न करत होतो. काही वेळानंतर अचानक जोरात आवाज आला. लोक विचारू लागले, "का बरं फटाके फोडत आहे?' मी लक्ष न देता पुन्हा कामात व्यस्त झालो. तेवढ्यात एक शेतकरी आला व म्हणाला, "अहो, तुम्ही आता जो आवाज केला ते काय होतं?' मी त्याला कारण विचारले तर तो म्हणाला, "आमच्या भागात वन्यप्राण्यांचा खूप त्रास आहे.

 

- प्राध्यापक करायचा लैंगिक शोषण, पीडित विद्यार्थिनीने घेतला हा निर्णय

हातातोंडाशी आलेली पिके जनावरे खाऊन घेतात. मोठे नुकसान होते. पिकांच्या संरक्षणासाठी रोज फटाके फोडावे लागतात. त्या आवाजामुळे जनावरे दूर राहतात.' मी त्याला सांगितले, "काही दिवसांनी या.' माझ्या डोक्‍यात कल्पना आली की अशा सायलेन्सरपासून बंदूक बनवावी. मग काय, वेगवेगळे प्रयोग करत काही दिवसांत बंदूक तयार केली. विशेष म्हणजे, यासाठी भंगारातून गोळा केलेले साहित्य वापरले. त्या शेतकऱ्याला बंदूक दिली. त्याला वापरायला सांगून त्यात आणखी सुधारणेबाबत सूचना करायला सांगितले.

दोन दिवसांनी शेतकरी समाधानाने परत आला. त्याने केलेल्या काही सूचनांप्रमाणे आणखी कष्ट घेऊन ही आताची सुधारित बंदूक तयार केली. मागील एक ते दीड वर्षात जवळपास एक हजार फटाका बंदूक विक्री केल्या आहेत. बाजारात आता पाइपच्या हलक्‍या बंदुकाही आल्या आहेत. परंतु, त्या धोकादायक ठरण्याची शक्‍यता लक्षात घेता मी या दणकटच बंदुका तयार करत आहेत, असे श्रीकांत कानफाडे म्हणाले. 

अमृता फडणवीस पुन्हा झाल्या ट्रोल, हे आहे कारण
 

वन्यप्राण्यांद्वारे शेतीमालाचे मोठे नुकसान होत असते. पिकांना इलेक्‍ट्रिक वायरचे कुंपण लावले तर ते प्राण्यांसह नागरिकांनाही धोकादायक ठरते. म्हणून यावर काही वेगळा उपाय करावा, यासाठी आवाज करणाऱ्या "फटाका बंदूक'ची निर्मिती केली. या बंदुकीचा मोठा आवाज होतो. इजा मात्र काहीही होत नाही. प्राणी पळून जातात आणि पिकांचे संरक्षण होते. 
- श्रीकांत कानफाडे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: new coffee type in market