अरे वा! न्यायालयात प्रकरणे दाखल करण्यासाठी नवी पद्धत.

गुरुवार, 25 जून 2020

वकिलांना प्रत्यक्ष न्यायालयामध्ये उपस्थित राहून आणि सोशल डिस्टिन्सिंगच्या नियमांचे पालन व्हावे या उद्देशाने ही पद्धत सुरु करण्यात आली आहे. तसेच, ईमेलद्वारेसुद्धा 30 जूनपर्यंत वकिलांना प्रकरण दाखल करता येणार आहे. या बाबत न्यायिक व्यवस्थापक ए. जी. जोशी यांनी नोटीस जारी केली आहे.

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये प्रकरणे दाखल करण्यासाठी "ड्रॉप बॉक्‍स' पद्धती सुरु करण्यात आली आहे. वकिलांना प्रत्यक्ष न्यायालयामध्ये उपस्थित राहून आणि सोशल डिस्टिन्सिंगच्या नियमांचे पालन व्हावे या उद्देशाने ही पद्धत सुरु करण्यात आली आहे. तसेच, ईमेलद्वारेसुद्धा 30 जूनपर्यंत वकिलांना प्रकरण दाखल करता येणार आहे. या बाबत न्यायिक व्यवस्थापक ए. जी. जोशी यांनी नोटीस जारी केली आहे.

ड्रॉप बॉक्‍सच्या ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी प्रत्येकाला प्रवेशिका दिली जात आहे. प्रवेशिकेसाठी ईमेलवर अर्ज सादर करणे आवश्‍यक आहे. प्रकरण दाखल केल्यानंतर प्रकरणांना स्टॅम्प क्रमांक देणे आणि काही आक्षेप असल्यास ते वकिलांना कळवणे ही प्रक्रिया 24 तासांनंतर केली जात आहे. दरम्यान, आक्षेपांच्या निराकरणासह इतर आवश्‍यक बाबींसदर्भातील निर्देशांचे वेळेत पालन करण्यात अपयश आल्यास प्रकरण खारीज करण्याची सूचना नोटीसमध्ये नमूद करण्यात आली आहे.

वाचा : कसे सांभाळणार शाळांचे अर्थकारण, सॅनिटायझेशनवर करावा लागेल तब्बल एवढा खर्च

तसेच, निर्देशांचे पालन करण्यासाठी वेळ वाढवून मिळण्याच्या विनंतीवर कायद्यानुसार विचार केला जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. प्रकरण दाखल करणे व अन्य प्रक्रिया पूर्ण करताना मास्क लावणे, शारीरिक अंतर ठेवणे, निर्जंतुकीकरण इत्यादी नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे. प्रकरणे 72 तासांपूर्वी सुनावणीसाठी घेतली जाणार नाहीत, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, प्रकरणावर तातडीची सुनावणी हवी असल्यास फायलिंगची प्रक्रिया इंटरनेटच्या माध्यमातून पूर्ण करावी लागणार आहे.