अभिनंदन! निखिल दुबेने दुसऱ्यांदा क्रॅक केली यूपीएससीची परीक्षा

Nikhil Dubey passes UPSC exam for second time
Nikhil Dubey passes UPSC exam for second time

नागपूर : केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे मंगळवारी घोषित करण्यात आलेल्या मुख्य परीक्षेच्या निकालात नागपूरच्या जुने मॉरिस कॉलेज येथील भारतीय प्रशासकीय सेवापूर्व प्रशिक्षण केंद्रातील निखिल दुबे याने 733 रँक मिलविला आहे. या केंद्रातील सहा विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत.

नागपूरच्या भारतीय प्रशासकीय सेवापूर्व प्रशिक्षण केंद्रात अभ्यास करणारा पुण्याचा प्रसाद शिंदे (२८७), नाशिकचा आशीष कांबळे (६५१), चंद्रपूरची प्रज्ञा खंडारे (७१९), नागपूरचा निखिल दुबे (733), चंद्रपूरचा सुमित रामटेके (७४८), स्वरूप दीक्षित (८२७) यांनी यूपाएससी परीक्षेत बाजी मारली.

निखील दुबे याने दुसऱ्यांदा यूपीएससी परीक्षा क्रॅक केली आहे. यापार्वी २०१८ मध्ये यूपाएससीत यश मिळवित इंडियन इन्फर्मेशन सर्व्हीसमध्ये सहायक संचालकपदी नियुक्ती मिळविली. २०१८ पासून तो या पदावर दिल्लीत कार्यरत आहे. अभियांत्रिकी पदवीनंतर एमबीए करणाऱ्या निखीलचे वडील मत्स्य विभागाचे सहायक आयुक्तपदावरून नियुक्त झाले आहेत. त्याचे मावस भाऊ अभिन व राजेश मोडक यांनी यापूर्वी यूपीएससीत बाजी मारली आहे. त्यांची प्रेरणा आणि मार्गदर्शनात निखलनेही २०१४ पासून यूपीएससीचा अभ्यास आणि तयारी सुरू केली.

राष्ट्रपीता ज्योतीबा फुले अभ्यासिकेतून पूर्ण डिव्होशनने अभ्यास सुरू होता. २०१८ मध्ये ही परीक्षा फळाला आली. यूपीएससीची परीक्षा देताना कठोर परीश्रमाला पर्याय नाही. दररोज किमान ७ ते ८ तास नियमित अभ्यास आवश्यक आहे. पूर्व परीक्षा महत्त्वाची आहे. ऑफ्शनल विषयांवर भर देणे क्रमप्राप्त आहे. चालू घडामोडींसाठी नियमित वृत्तपत्रांचे वाचन आवश्यक आहे. यातही सर्वात महत्त्वाचे चांगले मित्र अत्यावश्याक आहेत. यूपीएससीत अनेक विषय एकाचवेळी अभ्यासावे लागतात. यामुळे कोणत्याही विषयाकडे दुर्लक्ष करून भागणार नाही.

अभ्यासाची वेळ अधिकाधिक वाढविणे आवश्यक

मी सकाळी नऊ वाजसापासून अभ्यास करायचो. आवश्यक तेव्हाच ब्रेक घेऊन पुन्हा अभ्यासाला लागायचो. परीक्षा जवळ येईल तसतसे अभ्यासाची वेळ अधिकाधिक वाढविणे आवश्यक असल्याचा हितोपदेश निखीलने यूपीएससीची तयारी करू इच्छिनाऱ्या विद्यार्थांना दिला आहे.

 संपादन - नीलेश डाखोरे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com