कोरोनामुळे सर्व क्षेत्रांचे नुकसान मात्र या क्षेत्रावर झाला नाही परिणाम, आले "अच्छे दिन' 

agri productions
agri productions

नागपूर : कोरोना विषाणूमुळे जागतिक व्यापार मोठ्या संकटात सापडला आहे. कृषी उत्पादनांच्या निर्यातीस आलेल्या मरगळीमुळे भारताची अर्थव्यवस्था आधीच सुस्तावली आहे. मात्र कोरोनो विषाणू अशा वेळी आपल्या मदतीला धावून येईल अशी जाणकारांना आशा आहे. सगळ्यात मोठा निर्यातदार असलेल्या चिनकडून इतर देशांनी शेतमालाची आयातबंदी केली तर भारताला ही जागा पटकावण्याची सोनेरी संधी मिळणार आहे. 

कोव्हीड 19 च्या प्रादुर्भावाने चीनला फटका बसला आहे. अमेरिकेने आणीबाणी जाहीर केली असून युरोपातही दहशतीचे वातावरण आहे. जगभरात चीनकडून भाजीपाला, फळे, धान्यांसह इतर वस्तुंची निर्यात केली जाते. चीनकडून ही उत्पादने खरेदी करणाऱ्या प्रमुख बाजारपेठांमध्ये व्हिएतनाम, अमेरिका, जपान, यू.के., फिलिपिन्स, मलेशिया, रशिया आणि कोरिया यांचा समावेश आहे. चीनच्या या निर्यातीमुळे भारतीय कृषी उत्पादनांना मर्यादा येतात.

आयातबंदीमुळे चीनची जागा घेण्याची भारताला संधी 
या कठीण परिस्थितीत भारतीय शेतीमालास काय वाव आहे याचा विचार करण्यासाठी निर्यातसंधीबाबतचा एक अहवाल केंद्रीय कृषी मंत्रालयाने नुकताच केंद्रीय अर्थमंत्रालयाला सादर केला आहे. अहवालानुसार चालु वर्षात जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात चीनची निर्यात 17 टक्‍क्‍यांनी कमी झाली असून आयातीमध्येही 4 टक्के घट झाली आहे. याचा पायदा उचलण्यासाठी विविध 21 भारतीय कृषी उत्पादनांची यादी तयार करण्यात आली आहे. कोव्हीड 19 मुळे इतर देशांनी भारतीय कृषी उत्पादनांना प्राधान्य दिल्यास ती देशासाठी मोठी निर्यातसंधी राहणार असल्याचे म्हटले आहे. असे झाले तर भारतीय कृषी उत्पादने अनेक देशांमध्ये पोचून भविष्यातील हक्काच्या बाजारपेठा मिळतील अशा आशावाद आहे. 

2018 मधील निर्यातस्थिती 
चीन- 5488.6 दशलक्ष डॉलर 
भारत- 4445.9 दशलक्ष डॉलर 

या कृषी उत्पादनांना संधी 
नैसर्गिक मध, कांदे, मिरची, बटाटे, पेरू, आंबा, द्राक्षे, चिंच, काजू सफरचंद, लीची, चहा, मसाले, शेंगदाणे, सोयाबीन, भात, तीळ, कापुस, आंबा आदींचा समावेश आहे. तसेच परफ्यूम आणि फार्मसीसाठी उपयुक्त वनस्पतींचाही समावेश असल्याचे अहवालात नमूद केले आहे. भारताने 2018-19 मध्ये चीनला 191 दशलक्ष डॉलर कृषी उत्पादनांची निर्यात केली होती. चीनकडून भारताला बांबू आणि किडनी बिन्सची मोठी निर्यात होते. ही निर्यात कमी करून स्वयंपुर्ण होण्यासाठी भारताने देशात बांबू मिशन व अन्नसुरक्षा अभियान सुरु केले आहे.


अमेरिकेसह युरोपियन देशांनी चीनकडून कृषीची आयात जवळपास बंद केली आहे. कोणी काही म्हटले तरी चीनला या परिस्थितीतून बाहेर पडण्यास दोन वर्षांचा तरी कालावधी लागणार आहे. हीच आपल्यासाठी संदी आहे. ऍपेडासह कृषी मंत्रालयाने विविध देशांमध्ये आपली कृषी उत्पादने पोहचवून विश्‍वास निर्माण केला पाहिजे. यामुळे संकटातून संधी नाही तर समृध्दीचे द्वार खुले होणार आहे. 
- डॉ. शरद निंबाळकर, माजी कुलगुरू, अकोला कृषी विद्यापीठ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com