हॉस्पिटलच्या नावावर फक्त इमारत, ऑपरेशनचा थिएटरचा पत्ताच नाही

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 जानेवारी 2020

नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात नागपूरच्या काही लोकप्रतिनिधींनी हा प्रश्‍न सभागृहात लावून धरला होता. त्यात सरकारकडून उच्चस्तरीय समितीकडून मेडिकल, मेयो, सुपरचे निरीक्षण करून बैठक घेऊन प्रश्‍न सोडवण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यानुसार ही समिती नागपूरला आली. शुक्रवारी दुसऱ्या दिवशीचे निरीक्षण करून हा अहवाल सरकारला सादर केला जाणार आहे.
https://www.esakal.coAm/vidarbha/born-bear-bhandara-248837

नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) जळीत रुग्ण विभागात स्वतंत्र शल्यक्रिया गृहासह बालरुग्णांना ठेवण्याची स्वतंत्र सोय नसल्याचे वैद्यकीय शिक्षण खात्याकडून गुरुवारी मेडिकलमध्ये पाहणीसाठी आलेल्या उच्चस्तरीय समितीच्या निदर्शनात आले.

हे वाचाच - पावसाचे पाणी शिरले आणि हे बाहेर आले...

समिती येणार असल्याने मेडिकल प्रशासनाने गुरुवारी सकाळपासून विविध वॉर्डासह परिसरात स्वच्छता केली होती. त्यामुळे बहुतांश ठिकाणी समितीला स्वच्छता दिसली. समिती मेडिकल रुग्णालयातील विविध वॉर्ड आणि तपासणी केंद्रासह सुपरस्पेशालिटी रुग्णालय आणि मेयोतील जळीत रुग्ण विभागाची पाहणी केली. समितीत सोलापूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर, वैद्यकीय शिक्षण खात्याचे मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रदीप देशपांडे मेडिकलला दुपारी पोहोचले.

समितीला मेडिकलच्या बर्न वॉर्डात 28 खाटा आढळल्या. परंतु, येथे स्वतंत्र शल्यक्रिया गृह, खाटांचे स्वतंत्र अतिदक्षता विभाग, बालरुग्णांची स्वतंत्र्य सोय नसल्याचे दिसले. मेडिकल प्रशासनाने ही सोय सर्जिकल विभागात केल्याचे समितीला सांगितले. जळीत वॉर्डात रुग्णांच्या जखमा धुण्यासाठी आधुनिक सुविधा नव्हत्या. येथील काही रुग्णांसोबत समितीच्या सदस्यांनी संवादही साधला.

प्रत्येक विभागाचे छायाचित्रण ते स्वत:च्या मोबाईलसह इतर कॅमेऱ्यांमध्ये करीत होते. समितीसोबत मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांच्यासह इतरही काही अधिकारी होते. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात नागपूरच्या काही लोकप्रतिनिधींनी हा प्रश्‍न सभागृहात लावून धरला होता. त्यात सरकारकडून उच्चस्तरीय समितीकडून मेडिकल, मेयो, सुपरचे निरीक्षण करून बैठक घेऊन प्रश्‍न सोडवण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यानुसार ही समिती नागपूरला आली. शुक्रवारी दुसऱ्या दिवशीचे निरीक्षण करून हा अहवाल सरकारला सादर केला जाणार आहे.

मेयोची प्रशंसा

समितीला मेयोच्या जळीत रुग्ण विभागात महिला, पुरुष व बालकांसाठी स्वतंत्र्य खाटेची सोय, आधुनिक यंत्रासह जखमा धुन्याचीही यंत्रणा चांगली असल्याचे निदर्शनात आले. त्यावर या विभागाची समितीकडून प्रशंसा करण्यात आल्याचे मेयोच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No operation theater in the burn section of the medical