आता तरी होणार का मोकाट श्‍वानांचा बंदोबस्त

Not now but Mokat Shwenda settlement
Not now but Mokat Shwenda settlement

नागपूर : श्‍वानांचा रस्त्यांवर उपद्रव वाढलेला आहे. रस्त्यांवर श्‍वानांचे कळप दुचाकी किंवा इतर वाहनांसमोर येतात. अचानक श्‍वान पुढे येत आल्याने अपघात होण्याचे प्रमाण वाढल्याची बाब आज महापौर संदीप जोशी यांच्या जनता दरबारात नागरिकांनी उपस्थित करुन मोकाट कुत्र्यांच्या समस्येकडे लक्ष वेधले.

मोकाट कुत्र्यांचा रस्त्यावर उपद्रव वाढल्याचे वृत्त "सकाळ'ने सोमवारी प्रकाशित केले होते. त्या वृत्ताची दखल घेत नेहरु नगर झोनमधील जनता दरबारात नागरिकांनी महापौरांवर या प्रश्‍नांचा भडीमार केला. नागरिकांच्या तक्रारींसाठी महापौरांनी सकाळी दहा ते दुपारी एक ही वेळ निर्धारित केली होती. मात्र नेहरूनगर झोनमध्ये नागरिकांच्या तक्रारींचा ओघ पाहता महापौरांचा जनता दरबार दुपारी तीन वाजतापर्यंत सुरू होता. महापौरांनी जनता दरबारात आलेल्या नागरिकांची तक्रार ऐकून घेत त्यावर सुनावणी केली. यावेळी उपमहापौर मनीषा कोठे, विरोधी पक्ष नेता तानाजी वनवे, झोन सभापती समिता चाकोले, विधी समिती सभापती धर्मपाल मेश्राम, जलप्रदाय समिती सभापती विजय झलके, आरोग्य समिती उपसभापती नागेश सहारे, प्रतोद दिव्या धुरडे, नगरसेविका स्नेहल बिहारे, वंदना भुरे, रेखा साकोरे, नगरसेवक हरीश दिकोंडवार, सहायक आयुक्त स्नेहा करपे उपस्थित होते. नेहरूनगर झोनमधील जनता दरबारात तब्बल 130 तक्रारींवर महापौरांनी सुनावणी केली. जनता दरबारमध्ये नेहरूनगर कार्यालयात 75 तक्रारींची नोंदणी झाली होती. वेळेवर नव्या 55 तक्रारी स्वीकारण्यात आल्या. संपूर्ण 130 तक्रारकर्त्यांशी महापौरांनी संवाद साधला.

जनता दरबारात सर्वाधिक तक्रारी मलवाहिनी व अतिक्रमण संदर्भात होत्या. याव्यतिरिक्त वाढीव संपत्ती कर, उद्यानांमध्ये ग्रीन जिमची व्यवस्था, शौचालय व प्रसाधनगृहाचे काम सुरु करणे, बोअरवेल दुरुस्त करणे, दिव्यांग बांधवांसाठी लोडर ई-रिक्षा ची मागणी, मोकाट कुत्र्यांची नसबंदी यासह विविध विषयांवर तक्रारीचा भडीमार केला. दिघोरी परिसरात रहिवासी भागात वेश्‍या व्यवसाय चालत असल्याची तक्रार केली. महापौरांनी तातडीने संबंधित पोलिस अधिकाऱ्याशी संपर्क साधला. मनपाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी पोलिस प्रशासनाच्या सहकार्याने सदर भागात तातडीने कारवाई करून व्यवसाय बंद करण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

झाडांच्या फांद्या कापण्यासाठी 15 दिवसांपासून तक्रार करूनही त्यावर कोणतीही कारवाई करण्यात येत नाही. विभागाकडून तक्रारीकडे दुर्लक्ष केले जात असल्याची तक्रार अमृत कुडे यांनी केली. यासंदर्भात संबंधित विभागाने त्वरीत कार्यवाही करावी. कार्यवाही न झाल्यास संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापौरांनी दिला. नेहरूनगर झोनमधील काही परिसरांमध्ये वारंवार गडरलाईन चोक होत असल्याची तक्रारीही नागरिकांनी केल्या. या तक्रारींवर संबंधित अधिकाऱ्यांनी निरीक्षकासह पाहणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश महापौर जोशी यांनी दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com