निवडणुकीलाच आव्हान ! फडणवीस, मेघे यांना नोटीस

court.jpg
court.jpg

नागपूर : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि हिंगण्याचे आमदार समीर मेघे यांच्या निवडणुकीला आव्हान देणाऱ्या ऍड. सतीश उके आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विजय घोडमारे यांच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी दोघांनाही नोटीस बजावून 14 फेब्रुवारीपर्यंत उत्तर सादर करण्याचे आदेश दिले.
सविस्तर वाचा - गोरेवाडा जंगलाला आग

ऍड. उके यांनी फडणवीस तर घोडमारे यांनी समीर मेघे यांच्या निवडणुकीला आव्हान दिले आहे. फडणवीस दक्षिण-पश्‍चिम नागपूर तर समीर मेघे हिंगणा मतदारसंघातून विजयी झाले आहेत. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फडणवीस यांचे नामनिर्देशनपत्र व प्रतिज्ञापत्र चुकीच्या पद्धतीने स्वीकारले. प्रतिज्ञापत्र वेबसाइटवर अपलोड करण्यासाठी विलंब केला. दरम्यान, नामनिर्देशनपत्र व प्रतिज्ञापत्रातील अनेक त्रुटी अवैधपणे दूर करण्यात आल्या. त्यांना सुरक्षित करण्यासाठी अधिकाऱ्यांनी विविध गैरप्रकार केल्याचे याचिकेत म्हटले आहे. त्यानंतर पुरावे नष्ट करण्यात आले, असा आरोपी ऍड. उके यांनी केला आहे. दरम्यान, मेघे यांनी वर्धा जिल्ह्यातील अनेक मतदारांची नावे हिंगणा मतदारसंघात नोंदवली. त्यापैकी बहुतांशी मतदार मेघे यांच्या संस्थांमध्ये कर्मचारी आहेत. त्याचा फायदा निवडणुकीत मेघे यांना फायदा मिळाला, असा आरोप घोडमारे यांनी केला आहे. ऍड. उके यांनी आपली बाजू स्वत:च मांडली तर, माजी आमदार घोडमारे यांच्यातर्फे ऍड. आनंद देशपांडे, ऍड. अल्पेश देशमुख, निवडणूक आयोगातर्फे ऍड. नीरजा चौबे यांनी बाजू मांडली. न्या. मनीष पितळे यांच्यासमोर या प्रकरणावर सुनावणी झाली. त्यांनी 14 फेब्रुवारीपर्यंत प्रतिवादींना उत्तर दाखल करण्याचे आदेश दिलेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com