कुख्यात घरफोड्यास अटक; मध्यरात्री ३९ हजारांचा ऐवज नेला होता चोरून

Notorious burglar arrested Nagpur crime news
Notorious burglar arrested Nagpur crime news

नागपूर : शहरात अनेक ठिकाणी घरफोडी करणाऱ्या कुख्यात चोरट्यास यशोधरानगर पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून घरफोडीचे तीन गुन्हे उघडकीस आणले. २२ नोव्हेंबर २०२० रोजी राजीव गांधीनगर येथे राहणारे अजीज खान सुभान खान (४७) हे घरात झोपले होते. कडी नसल्याने दाराला दोरी बांधली होती. ही संधी साधून आरोपी शुभम ऊर्फ कालू मनीराम चुटे (२२, रा. इंदिरा मातानगर) हा घरात घुसला आणि ३९ हजारांचा ऐवज चोरून नेला.

सकाळी पाच वाजताच्या सुमारास खान यांचा लहान मुलगा झोपेतून उठला असता त्याला घरातील सामान अस्तव्यस्त अवस्थेत पडलेले दिसून आले. त्याचप्रमाणे समोरील दार उघडे होते. मुलाने वडिलांना आवाज देऊन ही माहिती दिली. कपाट उघडे होते. त्यात ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख ३५ हजार रुपये गायब होते. याप्रकरणी यशोधरानगर पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला होता.

शुक्रवारी रात्री शुभम हा राजीव गांधीनगर पुलाजवळ संशयास्पद अवस्थेत मिळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणले. त्याची सखोल चौकशी केली असता त्याने खान यांच्याकडे चोरी केल्याची कबुली दिली. त्याचप्रमाणे आणखी तीन ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली दिली.

पोलिसांनी तीन गुन्हे उघडकीस आणून त्याच्याजवळून ३० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही कामगिरी पीआय अशोक मेश्राम, सहायक उपनिरीक्षक प्रकाश काळे, विनोद सोलव, विजय लांजेवार, मधुकर निखाडे, रत्नाकर कोठे यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com