गुंडाने आत्महत्येपूर्वी लिहिली सुसाईड नोट ‘मेरी पत्नी मुझे छोडकर चली गई, मैं जिंदा रहकर क्या करूंगा’

Notorious goon commits suicide in Nagpur
Notorious goon commits suicide in Nagpur

नागपूर : हुडकेश्वर ठाण्यांतर्गत राहणाऱ्या कुख्यात गुंडाचा करुण अंत झाला. प्रेमविवाह केल्यांतर त्याच्या गुंडगिरीला आणि दारूच्या व्यसनाला कंटाळून पत्नीही सोडून गेली. आयुष्यात एकाकी पडलेल्या गुंडाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रवीण लालसिंग चव्हाण (३५, रा. चिमुरकर ले-आऊट, नीलकंठनगर) असे मृताचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण चव्हाण गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता. त्याच्यावर चोरी, दरोडे, हत्या, हत्येचा प्रयत्न, धमकी, लुटमारीचे जवळपास २० पेक्षा जास्त गुन्ह्यांची नोंद आहे. त्याला दारूचे व्यसन होते. यामुळे पत्नीही घर सोडून गेली होती. उल्लेखनीय म्हणजे चार दिवसांपूर्वीच हुडकेश्वर पोलिसांनी त्याला तलवार घेऊन दहशत निर्माण केल्याप्रकरणी ताब्यात घेतले होते.

पूर्वीपासून प्रवीणची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि संगत गुन्हेगारीवृत्तीच्या सहकाऱ्यांशी असल्याने त्याने गुंडगिरीत जम बसविला होता. प्रवीणने प्रेमविवाह केला होता. पत्नीसह नव्याने सुखी संसार सुरू असतानाच तो चोरी, दरोडे, हत्या, हत्येचा प्रयत्न, धमकी, लुटमार करीत होता. या प्रकरणी त्याच्यावर २० च्यावर गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यात तो अनेकवेळा कारागृहातही गेला आहे.

पण, तेथून बाहेर आल्यानंतर त्याने पुन्हा गुन्हेगारी सुरू ठेवली. याच दरम्यान वाईट संगतीमुळे त्याला दारूचे व्यसन जडले. रात्रंदिवस दारू पिवून परिसरात धिंगाणा घालणे सुरू केले. घरी परतल्यानंतर कोणी दिसत नसल्यामुळे तो हताश राहू लागला. अखेर त्याने शनिवारी घरात सिलिंग फॅनला साडी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली.

त्यापूर्वी त्याने दारू प्यायल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले. याप्रकरणी फिर्यादी हनुमानसिंग ज्योतीसिंग तोवर (वय २३, रा. यवतमाळ) यांनी दिलेल्या सुचनेवरून हुडकेश्वर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

‘मेरी जिंदगी झंड हो गई’

‘मेरी जिंदगी झंड हो गई... मेरी पत्नी भी मुझे छोडकर चली गई... मैं जिंदा रहकर क्या करूंगा...’ असा उल्लेख सुसाईड नोटमध्ये केला आहे. सुसाईट नोट पोलिसांनी जप्त केली आहे. तो पत्नीच्या विरहात नैराश्‍यात गेला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com