आता उपराजधानीत होणार एलएचबी कोचची देखभाल दुरुस्ती; मोतीबाग कारखान्याची मोठी उपलब्धी

Now maintenance of LHB coaches will be done in Nagpur
Now maintenance of LHB coaches will be done in Nagpur

नागपूर ः दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील मोतीबाग कारखान्यात प्रवासी ट्रेनला जोडल्या जाणाऱ्या एलएचबी कोचच्या देखभाल दुरुस्तीची कामे सुरू करण्यात आली आहे. या कारखान्यात अलिकडेच पहिल्या डब्याचे काम यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले आहे. ही मोतीबाग कारखान्याची मोठी उपलब्धी मानली जात आहे.

प्रवासी सुरक्षेला प्राधान्य देणाऱ्या भारतीय रेल्वेने आधुनिक अशा एलएचबी कोचच्या वापराला प्राधान्य दिले आहे. त्यानुसार जुने डबे हटवून एलएचबी कोचेस लावले जात आहे. रेल्वे अपघात झाल्यासही या डब्यांमुळे क्षती मोठ्याप्रमाणावर कमी होते. ठरावीक कालावधीनंतर या डब्यांची देखभाल दुरुस्ती आवश्यक असते. ती जबाबदारी मोतीबाग कारखान्याकडे सोपविण्यात आली आहे. 

ऐतिहासिक पार्श्वभूमी असणाऱ्या मोतबाग शेडमध्ये पूर्वी नॅरोगेज इंजिनची देखभाल दुरुस्ती करण्यात येत होती. नॅरोगेज रेल्वे संपुष्टात आल्याने मोतीबागचे लोको शेडही संकटात आले होते. कारखान्याचे लौकिक कायम रहावे यादृष्टीने कोचेसच्या देखभाल दुरुस्‍तीची कामे सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला. अलीकडेच पहिल्या डब्याचे काम यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले. जानेवारी महिन्यात निवृत्त होणारे कर्मचारी आर. नायर, एस. के. धिंग्रा आणि विनोद मेश्राम यांच्या हस्ते या डब्याचे अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अनावरण करण्यात आले.

रेल्वेच्या मानकांनुसार एलएचबी कोच लागोपाठ ३६ महिने लागोपाठ धावल्यानंतर त्याची देखभाल दुरुस्ती करणे बंधनकारक आहे. या प्रक्रियेत डब्याची चाकापासून छतापर्यंत पूर्णपणे देखभाल दुरुस्ती केली जाते. नादुरुस्त भाग काढून नवे लावले जातात. एकूणच जुन्या डब्याचे नुतणीकरण केले जाते. त्यानंतर पुन्हा तो रेल्वेला जोडला जातो. या उपलब्धीमुळे दपूमरे एलएचबी नॉन एसी ट्रेनच्या देखभाल दुरुस्तीत आत्मनिर्भर होणार आहे.

खर्च व वेळेची बचत

यापूर्वी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेकडून एलएचबी कोच देखभाल दुरुस्तीसाठी पश्चिम बंगालच्या लिलुआ येथील कार्यशाळेत पाठविले जात होते. डबे पाठविणे, परत आणणे आणि दुरुस्ती यात सुमारे दोन महिन्यांचा कालावधी जात होता. कार्यशाळेला प्रतिडबा १३ लाख रुपये प्रमाणे मोबदला द्यावा लागायचा आता नागपुरातच देखभाल दुरुस्तीचे काम होणार असल्याने वेळ आणि लागणाऱ्या खर्चात मोठी बचत होणार आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com