आजारी विद्यार्थ्यांचा आकडा 49 हजारांच्या वर

The number of sick students is above 49 thousand
The number of sick students is above 49 thousand

नागपूर : राष्ट्रीय बालआरोग्य अभियानांतर्गत 6 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांच्या आरोग्याची तपासणी केली जाते. गत वर्षभरात जिल्ह्यातील 2 हजार 541 शाळांमध्ये 3 लाख 95 हजार 836 विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यात 49 हजार 348 विद्यार्थी किरकोळ आजारग्रस्त आढळून आले.

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत शालेय आरोग्य कार्यक्रम राज्यात फेब्रुवारी 2008 पासून राबविला जात होता. या कार्यक्रमात वय वर्ष 6 ते 18 वयोगटातील शहरी व ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याची तपासणी केली जात होती. लहान मुलांमधील जन्मजात विकृती, कमतरतेमुळे होणारे आजार, वाढीच्या वेळी होणारे आजार यांचे वेळीच निदान करून उपचाराचा समावेश आहे. 13 तालुक्‍यांतील ग्रामीण भागात 2 हजार 413 शाळांना दिलेल्या भेटीत 3 लाख 61 हजार 88 विद्यार्थ्यांची तपासणी केली असता 43 हजार 678 विद्यार्थ्यांना किरकोळ आजारग्रस्त आढळले. तर, जिल्ह्यातील 7 नगरपंचायत क्षेत्रात असलेल्या 131 शाळांमध्ये पथकाने 45 हजार 331 विद्यार्थ्यांच्या आरोग्याची तपासणी केली. त्यात 5 हजार 670 विद्यार्थी किरकोळ आजारग्रस्त असल्याचे समोर आल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली.


नागपूर ग्रामीणमध्ये सर्वाधिक 11 हजार

  • तालुका शाळा तपासणी विद्यार्थी आजारी
  • कामठी 103 13 हजार 131 1 हजार 758
  • नरखेड 184 20 हजार 80 1 हजार 721
  • मौदा 186 24 हजार 956 1 हजार 758
  • कळमेश्‍वर 120 11 हजार 524 1 हजार 329
  • भिवापूर 130 11 हजार 448 710
  • उमरेड 178 26 हजार 117 2 हजार 271
  • पारशिवनी 157 23 हजार 133 1 हजार 942
  • काटोल 215 25 हजार 272 3 हजार 720
  • रामटेक 177 20 हजार 397 3 हजार 764
  • कुही 206 21 हजार 662 4 हजार 256
  • सावनेर 209 38 हजार 227 5 हजार 97
  • हिंगणा 207 42 हजार 175 3 हजार 645
  • नागपूर ग्रामीण 341 82 हजार 646 11 हजार 28

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com