esakal | घरातील कुटूंब साखरझोपेत असतानाच अचानक आभाळ कोसळले अन्… वाचा पुढे 
sakal

बोलून बातमी शोधा

jirn ghar

सदर येथील आझाद चौक परिसरात अशोक हिरालाल टेकसुलतान यांचे जीर्ण घर आहे. सोमवारी पहाटे पावणेपाच वाजताच्या सुमारास हे घर पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळले. यावेळी घरात पाचजण होते.

घरातील कुटूंब साखरझोपेत असतानाच अचानक आभाळ कोसळले अन्… वाचा पुढे 

sakal_logo
By
राजेश प्रायकर

नागपूर ः सोमवारी, २४ ऑगस्टची पहाट… सर्वजण साखर झोपेत होते… असे काही घडेल असे कोणालाही कल्पना नव्हती... अशावेळी शहरातील सदर भागातील एक जीर्ण इमारत क्षणार्धात धाराशाही झाली. या घटनेत त्या घरातील ४३ वर्षीय व्यक्तीला आपले प्राण गमवावे लागले, तर घराच्या मलब्यात दबलेल्या चौघांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. मात्र, हे चारहीजण जखमी असून यात ६४ वर्षीय महिलेचा समावेश आहे. विशेष म्हणजे महापालिकेकडून अशा घरांच्या मालकांना वा किरायादारांना नोटीस दिल्यानंतरही संबंधित इमारत खाली केली जात नसल्याने अनेकांचे जीव धोक्यात आहेत. 

सदर येथील आझाद चौक परिसरात अशोक हिरालाल टेकसुलतान यांचे जीर्ण घर आहे. सोमवारी पहाटे पावणेपाच वाजताच्या सुमारास हे घर पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळले. यावेळी घरात पाचजण होते. घर पडल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी अग्निशमन विभागाला दिली. माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे सिव्हिल लाईन, सुगतनगर, कॉटन मार्केट, गंजीपेठ अग्निशमन केंद्रातील जवान घटनास्थळी रवाना झाले.

अग्निशमन व आणीबाणी विभागाच्या जवानांनी तत्काळ मदतकार्यास सुरुवात केली. घरात दबलेल्या एकाला बाहेर काढण्यात आले. ४३ वर्षीय किशोर टेकसुलतान, ५५ वर्षीय प्रभा टेकसुलतान, ६५ वर्षीय लक्ष्मी टेकसुलतान, २२ वर्षीय लोकेश टेकसुलतान, ३२ वर्षीय राकेश सिरोहिया हे मलब्यात दबले होते. आणीबाणी विभागाच्या जवानांनी या सर्वांना बाहेर काढले. पाचही जणांना बाहेर काढताच ॲम्बलुन्सने मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

हेही वाचा - नागपूर ग्रामीण ब्रेकिंगः अखेर विहिरीत पडलेला एक मूषक ठरला ‘त्या’ तिघांचा काळ ...
 

जीर्ण घर कोसळल्याने गंभीर जखमी झालेले ४३ वर्षीय किशोर टेकसुलतान यांना डॉक्टरांनी तपासणीनंतर मृत घोषित केले. जखमी चौघांवर उपचार सुरू आहेत. घराचा पूर्ण मलबा हटवून चौघांना बाहेर काढण्याचे काम सकाळी सव्वासात वाजेपर्यंत सुरू होते. मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांच्या नेतृत्त्वात उपमुख्य अग्निशमन अधिकारी बी. पी. चंदनखेडे, केंद्र अधिकारी डी. एन. नाकोड, तुषार बारहाते, अनिल गोले यांनी घटनास्थळी जाऊन मदतकार्य केले. या जीर्ण घराने एकाचा बळी घेतल्यानंतर शहरातील अत्यंत धोकादायक ९७ घरांतील नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. 

उघडून तर बघा - चिमुकल्यांची आर्तहाक... ‘बाबाऽऽ प्लीज, तुम्ही जेथे असाल तेथून घरी परत या...'
 

१७३ इमारतीतील नागरिकांचा जीव धोक्यात 

शहरातील १७३ इमारती जीर्ण व धोकादायक असून यातील किमान हजार नागरिकांचा जीव धोक्‍यात आहे. राहण्यास अयोग्य व तत्काळ निष्कासित करावयाच्या ९७ इमारती आहेत. इमारत रिकामी करून दुरुस्ती करावयाच्या २५, इमारत रिकामी न करता दुरुस्ती करावयाच्या ३५ इमारती आणि किरकोळ दुरुस्तीची गरज असलेल्या १६ इमारती आहेत. ९७ इमारती तत्काळ पाडण्याची गरज आहे. परंतु याबाबत अधिकाऱ्यांची उदासीनता दिसून येत आहे. 

संपादन ः राजेंद्र मारोटकर

go to top