one lakh and fifty thousand families still waiting for tap connection in rural nagpur
one lakh and fifty thousand families still waiting for tap connection in rural nagpur

शोकांतिका! तब्बल दीड लाखांवर कुटुंबीयांना नळजोडणीची प्रतीक्षा, अद्यापही टँकरने पाणीपुरवठा

नागपूर : ग्रामीण भागातील ५९ गावांमध्ये अद्याप नळ लाइनच पोहोचलेली नसून १२१६ गावातील १.६६ लाखांवर कुटुंबांना नळ कनेक्शनच नसल्याची माहिती समोर आली आहे. येथील नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत असून टँकर, बोअरवेलच्या माध्यमातून पाणी पुरवठा करण्यात येत आहे. जलजीवन मिशनअंतर्गत २०२४ पर्यंत प्रत्येक कुटुंबाला स्वतंत्र नळ कनेक्शन देण्याचे उद्दिष्ट आहे. 

जलजीवन मिशन अंतर्गत नागपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये आज घडीला ६७ गावांमध्ये नळ योजनेचे काम जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या माध्यमातून सुरू आहे. जलजीवन अंतर्गत आता ज्या गावांमध्ये पाणी पुरवठा योजना कार्यान्वित आहे, त्या गावांतील जलस्रोतांचे परीक्षण करण्यात येईल. जलस्त्रोताची सोय आहे, अशा ठिकाणी पंपाची क्षमता, पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी नवीन टाकी लावण्यात येईल. पाणी पुरवठ्याच्या नळ लाइनचे परीक्षण करून आवश्यकता भासल्यास तिथे नळ लाईन वाढविण्यात येईल. पाण्याची अधिकाधिक साठवणूक करण्यासाठी त्या गावांतील बोअरवेल अथवा विहिरींची साफ सफाई करण्यात येईल. त्यांची खोली वाढविल्या जाईल. नळ कनेक्शनपासून वंचित घरांना नळ कनेक्शन दिले जाणार आहे. सद्यस्थितीत ग्रामीण भागातील प्रती कुटुंब प्रती व्यक्तीला ४० लिटर पाणी देण्यात येते. जलजीवन मिशन अंतर्गत ५५ लिटर पाणी पुरवठ्याचे उद्दिष्ट आहे. 

तालुका मंजूर कामे चालू कामे वंचित गावे
नागपूर (ग्रा.) ११० ३ 
नरखेड ८० ० 
पारशिवनी ८५ १० 
रामटेक १३२ १० 
सावनेर ७१ ० 
उमरेड ११४ १३ 
भिवापूर ८९ ४ 
हिंगणा ९२ ११ ४ 
कळमेश्वर ७२ ० 
कामठी ६७ २ 
काटोल १०४ २ 
कुही १०८ ६ 
मौदा ९२ ५ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com