पुन्हा लस संपली हो... असे म्हणण्याची वेळ येणार; मेडिकलसाठी केवळ १,५०० लस

Only 1500 vaccines for medical hospital Nagpur corona vaccine news
Only 1500 vaccines for medical hospital Nagpur corona vaccine news

नागपूर : लशींचा तुटवडा असल्याने मेडिकलमधील लसीकरण ३६ तास बंद होतं. जिल्ह्यात आजपर्यंत कोव्हॅक्सिनचे सर्वाधिक लसीकरण करणाऱ्या मेडिकलमधील लसीकरण केंद्राला केवळ १५०० डोस देऊन बोळवण करण्यात आली आहे. अवघ्या दोन दिवसात हा साठा संपेल. यानंतर पुन्हा लस संपली हो..असे म्हणण्याची वेळ मेडिकलमधील लसीकरण पथकावर येणार आहे. 

नागपूर जिल्ह्यात कोव्हॅकिनचा साठा संपला होता. त्यामुळे येथील पाचही केंद्रातील लसीकरण थांबले होते. काही केंद्रात कोविशिल्डच्या लसी उपलब्ध केल्यावर त्याचे लसीकरण सुरू झाले. परंतु मेडिकलने एक मात्रा दुसरी व दुसरी मात्रा दुसरी अशी गल्लत होऊ नये म्हणून कोव्हॅक्सिनचे लसीकरण करणार अशी भूमिका घेतली. कोव्हॅक्सिन लस उपलब्ध करून द्यावी अशीच मागणी केली.

कोव्हॅक्सिनची लस संपल्यानंतर येथे लसीकरणाला थांबा लागला होता. शुक्रवारी नागपुरात कोव्हॅक्सिनच्या ११ हजार ३६० मात्रा पोहचल्या. महापालिकेला सुमारे ५ हजार काही लसींच्या मात्रा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मात्र महापालिकेने केवळ १,५०० लसी देऊन मेडिकलची बोळवण केली आहे. दोन दिवसांत या लस संपण्याची शक्यता आहे. सध्या सर्वाधिक कोरोना बाधितांवर मेडिकलमध्येच उपचार सुरू आहेत. अशाप्रकारे लस वितरणात पक्षपाती भूमिका का घेण्यात येत आहे, याचे आश्चर्य व्यक्त होत आहे. 

गरज भासल्यास आणखी दिली जाईल
महापालिकेला आवश्यकतेनुसार लसींचा साठा उपलब्ध झाला आहे. मेडिकलला १,५०० लसींची मात्रा दिली. गरज भासल्यास आणखी दिली जाईल. केवळ एका केंद्राला जास्त लसी देणे शक्य नाही. 
- डॉ. संजय चिलकर,
मुख्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका, नागपूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com