पूर्व विदर्भात मलेरियाचे थैमान; तर ३० लाख लोकसंख्येच्या नागपुरात ३ रुग्ण

केवल जीवनतारे
Wednesday, 21 October 2020

गडचिरोली जिल्ह्यात ४ हजार ९५७ मलेरियाग्रस्त आढळून आले आहेत. गडचिरोलीतील स्थानिक आरोग्य प्रशासनाने चिंता व्यक्त केली आहे. मात्र, नागपूर जिल्ह्यात शहर आणि ग्रामीण भागात ९ महिन्यात अवघे ६ रुग्ण आढळले आहेत.

नागपूर : यंदा कोरोनाने थैमान घातले आहे. त्यामुळे इतर आजारांकडे आरोग्य यंत्रणेचे साफ दुर्लक्ष झाले आहे. नागपूर वगळता पूर्व विदर्भात मलेरियाने हातपाय पसरले आहेत. मात्र, ३० लाख लोकसंख्येच्या नागपूर शहरात अवघे ३ मलेरियाग्रस्त आढळून आले आहेत. २५ लाख लोकसंख्या असलेल्या ग्रामीण भागातही अवघे ३ मलेरियाचे रुग्ण आढळले. यामुळे आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. 

गडचिरोली जिल्ह्यात ४ हजार ९५७ मलेरियाग्रस्त आढळून आले आहेत. गडचिरोलीतील स्थानिक आरोग्य प्रशासनाने चिंता व्यक्त केली आहे. मात्र, नागपूर जिल्ह्यात शहर आणि ग्रामीण भागात ९ महिन्यात अवघे ६ रुग्ण आढळले आहेत. यामुळे नागपूर जिल्ह्यातील आकडेवारी फसवी आहे की, खरी हे मात्र गुलदस्त्यात आहे. पूर्व विदर्भात गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा, भंडारा आणि नागपूर जिल्ह्यांत मलेरियाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. जानेवारी ते सप्टेंबर २०१९ या कालावधीत मलेरिया १ हजार ६८३ रुग्ण आढळले आहेत. यातील 5 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यावर्षी जानेवारी ते सप्टेंबर २०२० या ९ महिन्यांच्या कालावधीत मलेरियाचे ५ हजार ४३८ रुग्ण आढळले आहेत, तर १२ मृत्यू झाले आहेत. मृत्यूमध्येही ७ ने वाढ झाली आहे. नागपूर शहरात मलेरिया नियंत्रण मोहीम गेल्या ९ महिन्यांपासून थंडबस्त्यात आहे. यानंतरही मलेरियाचे रुग्ण आढळून आले नाही. यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. 

हेही वाचा - शेतकऱ्याने लढवली शक्कल; शेतपिकांच्या सुरक्षेसाठी...

तीन महिन्यात वाढले साडेतीन हजार मलेरियाग्रस्त - 
विशेष असे की, पूर्व विदर्भात यावर्षी जून २०२० पर्यंत १ हजार ७९४ मलेरियाग्रस्त आढळून आले होते. यात ५ मृत्यू झाले होते. आरोग्य विभागाच्या पुणे येथील कार्यालयात ही माहिती नोंदविली आहे. जुलै ते सप्टेंबर २०२० या ३ महिन्यांत ३ हजार ६४४ मलेरियाग्रस्त पूर्व विदर्भात वाढले. जानेवारी ते सप्टेंबर २०२० या कालावधीत मलेरियाचा आकडा फुगून ५ हजार ४३८ वर पोहोचला आहे, तर मृतांचा आकडा १२ वर पोहोचला आहे. 

१ जानेवारी ते ३० सप्टेंबर २०१९ दरम्यान आढळलेले मलेरियाचे रुग्ण -

जिल्हा रुग्ण मृत्यू
नागपूर (ग्रा) १ 
नागपूर (शहर) १ 
भंडारा ० 
गोंदिया १६
चंद्रपूर ३८
चंद्रपूर (ग्रा)
गडचिरोली  १४०९
वर्धा ० 

हेही वाचा - हो साहेबऽऽ चोरी केली आम्ही; मात्र, एकाही पैशाला हात लावला नाही; वाचा काय सांगतात चोरटे

१ जानेवारी ते ३० सप्टेंबर २०२० दरम्यान आढळलेले मलेरियाचे रुग्ण -

जिल्हा रुग्ण मृत्यू
नागपूर (ग्रा) ३ 
नागपूर (शहर)
भंडारा
गोंदिया  ७७
चंद्रपूर  १६८  
चंद्रपूर (ग्रा) ० 
गडचिरोली ४९५७

संपादन - भाग्यश्री राऊत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: only 3 patients of malaria found in nagpur