पात्रताधारकांना डावलून केवळ पदव्युत्तर पदवीधारकांची तासिका तत्वावर नियुक्ती, प्र-कुलगुरूंकडे तक्रार

only graduation candidate appointed on hourly basis in nagpur university
only graduation candidate appointed on hourly basis in nagpur university

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विविध शैक्षणिक विभागांमध्ये पात्रताधारकांना डावलून केवळ पदव्युत्तर पदवीधारकांची तासिका तत्त्वावरील प्राध्यापकपदी नियुक्ती केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, विद्यापीठाच्या हिंदी विभागामध्ये तीन उमेदवारांची अशी नियुक्ती झाल्याची तक्रार प्र-कुलगुरूंकडे करण्यात आली आहे. 

नागपूर विद्यापीठात मोठ्या प्रमाणात जागा रिक्त आहेत. यंदा कोरोनामुळे महाविद्यालये बंद असल्याने विद्यापीठाने कंत्राटी प्राध्यापकांची अद्यापही नियुक्ती केलेली नाही. त्यामुळे विविध विभागांमध्ये आता तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांची नियुक्ती केली जात आहे. ही नियुक्ती करण्याचे अधिकार हे विभाग प्रमुखांना दिले आहेत. विभाग प्रमुखांकडून पात्रताधारक उमेदवारांची नियुक्ती करून त्याचे नाव हे विद्यापीठाकडे पाठवले जाते. राज्य शासनाच्या सुधारित निर्णयानुसार तासिका तत्त्वावर प्राध्यापकांची नियुक्तीसाठी उमेदवार हा संबंधित विषयात नेट, सेट किंवा पीएच.डी. उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे. मात्र, असे असतानाही हिंदी विभागामध्ये केवळ पदव्युत्तर उत्तीर्ण उमेदवारांची तासिका तत्त्वावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे विभागप्रमुखांनी विद्यापीठ प्रशासनाला अंधारात ठेवून ही नियुक्ती केल्याचा आरोप पात्रताधारक उमेदवारांकडून होत आहे. 

नेट, सेटसारखी कठीण परीक्षा उत्तीर्ण असणारे अनेक उमेदवार असतानाही त्यांना डावलून अनेक विभागांमध्ये अशाप्रकारच्या नियुक्ती होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यासंदर्भात प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे यांच्याकडे तक्रार करण्यात आली असून विद्यापीठाने यावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com