सावधान! दुचाकीवर यापुढे केवळ एकच व्यक्‍ती

अनिल कांबळे | Sunday, 19 July 2020

मास्क न लावता सिव्हिल लाइन्समधील वॉकर स्ट्रीटवर फिरणाऱ्या 28 नागरिकांविरुद्ध र पोलिसांनी कारवाई केली.

नागपूर : कोरोना विषाणूचा संसर्ग ज्या गतीने उपराजधानीत वाढत आहे, त्याच गतीने मृत्यूदेखील वाढत आहेत. 30 लाखांच्या शहरात कोरोनाबाधिताची संख्या कमी आहे; परंतु दर दिवसाला होणारे मृत्यू नजरेआड करता येत नाही.

वा रे पठ्ठे...शाळेलाच पाठवले ऑनलाइन क्लासेसचे बिल

5 जुलैपासून सुरू झालेले मृत्युसत्र थांबत नाही. अवघ्या 13 दिवसांत 24 मृत्यू झाले असून, ही बाब प्रशासनासाठी चिंताजनक बनली आहे. शुक्रवारी एकाच दिवशी पाच जण कोरोनाने दगावल्यानंतर लगेच शनिवारी (ता. 18) आणखी दोन कोरोनाचे मृत्यू झाले. तर 102 जणांना कोरोनाची बाधा झाली.

कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता वाहतूक पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आता दुचाकीवर डबलसिट आणि शहरातील ऑटो वाहतूक बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे आता दुचाकीवरून जर पत्नीसोबतही जात असला तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते. शहरातील ऑटो वाहतूक बंद करण्याचा आदेश असलेले एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत होते. त्यामध्ये ऑटो बंद आणि दुचाकीवरही डबलसीट असल्यास कारवाई करण्याचे आदेश आहेत. 

मास्क न लावणाऱ्यांवर कारवाई 
मास्क न लावता सिव्हिल लाइन्समधील वॉकर स्ट्रीटवर फिरणाऱ्या 28 नागरिकांविरुद्ध पोलिस उपायुक्त विनीता साहू यांच्या नेतृत्वात सदर पोलिसांनी कारवाई केली. सर्व नागरिकांविरुद्ध साथरोग अधिनियम, आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले. साहू यांच्या नेतृत्वात सदर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश बनसोडे व त्यांच्या सहकऱ्यांनी ही कारवाई केली. 

(संपादन : प्रशांत राॅय)