हे काय, जागेचा ताबा मिळण्यासाठी केली त्याने "वीरूगिरी'

संदीप गौरखेडे
मंगळवार, 21 जानेवारी 2020

अखेर न्याय मिळत नसल्याने संतापलेल्या भरात जागेचा ताबा मिळण्यासाठी गावातील पाण्याच्या टाकीवर चढून "वीरूगिरी' करीत आत्महत्या करण्याचा निश्‍चय एका वैतागलेल्या व्यक्‍तीने केला.

कोदामेंढी (जि.नागपूर) : बेरोजगारीवर मात करण्यासाठी आणि अंगात असलेल्या कौशल्याच्या बळावर वेल्डिंगचे दुकान लावण्यासाठी शासनाच्या निकषानुसार रीतसर मौदा येथील दुय्यम निबंधकाच्या कार्यालयात रजिस्ट्री केली. मात्र 2017 पासून तारसा ग्रामपंचायतीने जागेचा ताबा दिला नाही. सर्वच शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवले. इथवर संपले नसून राष्ट्रपती, पंतप्रधान यांना पत्र पाठवीत तीस वेळा मुंबई मंत्रालयात गेले. अखेर न्याय मिळत नसल्याने संतापलेल्या भरात जागेचा ताबा मिळण्यासाठी गावातील पाण्याच्या टाकीवर चढून "वीरूगिरी' करीत आत्महत्या करण्याचा निश्‍चय एका वैतागलेल्या व्यक्‍तीने केला.

 

क्‍लिक करा  :  शेतक-यांसाठी मजूरानेही दिले पैसे

 

अठ्ठावीस वर्षाचा संघर्ष
तारसा येथील मनोहर विश्वनाथ बडवाईक असे त्यांचे नाव आहे. मनोहर यांचे तारसा येथे वेल्डिंग वर्कशॉपचे दुकान होते. मात्र ग्रामपंचायतीने अतिक्रमणाचे धोरण राबवीत त्यांच्या दुकानाचा ठेला जप्त केला. शासनाच्या भूखंड वाटप (लीज) धोरणानुसार त्यांनी 100 चौरस मीटर भूखंडाची लीज मंजूर केली. 2017 साली दुय्यम निबंधकाच्या कार्यालयात 27,700 रुपये भरून लीजची रजिस्ट्री करण्यात आली. मात्र तेव्हापासून मनोहर यांना 100 चौरस मीटर जागेचा ताबा मिळाला नाही. स्थानिक ग्रामपंचायतीने हेतुपुरस्पर विरोध करीत जागेचा ताबा मिळू दिला नाही. याकरिता ते मुंबई मंत्रालयात तीस वेळा जाऊन आले. जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, खंडविकास अधिकाऱ्यांना बरेचदा पत्र दिले. मात्र एकही अधिकारी न्याय देऊ शकला नाही. प्रशासनाच्या अशा ढिसाळ कामाचा उल्लेख त्यांनी राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांना केलेल्या पत्रातदेखील केलेला आहे. तारसा गावात बरेच अतिक्रमण आहेत आणि शासकीय पडीक जागा देखील आहे. मात्र येथील प्रशासनाने जागा मनोहर यांना मिळू नये याची जणू शपथच घेतली असावी असावी.

क्‍लिक करा  : आईने बाळाला वॉकरमध्ये ठेवले अन झाला घात

अनेक कार्यालयांचे झिजविले उंबरठे
शासनाने मनोहर यांना व्यवसाय करण्यासाठी दिलेल्या जागेवर ग्रामपंचायतीने कोंडवाडा बांधण्याचे धाडस केले. मात्र वेळीच "स्टे' आणल्याने बांधकाम थांबविण्यात आले. गावात इतरत्र रिकामी जागा असूनदेखील मुद्दामहून मनोहर यांना मानसिक, शारीरिक त्रास देण्याचे काम येथील प्रशासनाने वेळोवेळी केले असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. अठ्ठावीस वर्षांपासून मनोहर व्यवसाय थाटण्यासाठी लढा देत आहेत. मात्र अखेर त्यांनी रीतसर आज पाण्याच्या टाकीवर चढून आत्महत्या करण्याचे धाडस केले. वेळीच तहसीलदार प्रशांत सांगडे आणि मौदा पोलीस घटनास्थळी पोहचली. त्याची समजूत घालून टाकीवरून उतरविण्यात आले.

क्‍लिक करा : दुनिया चकाचौंध की दिवानी भई

प्रस्ताव तयार करू !
याबाबतच प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवू.
प्रशांत सांगडे, तहसीलदार, मौदा

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In order to occupy the space, he made "bravery"