विद्यापीठाच्या स्थानिक चौकशी समितीत मर्जीच्या लोकांची वर्णी, निष्पक्ष चौकशीवर प्रश्नचिन्ह

partiality may happen in investigation through local inquiry committee of nagpur university
partiality may happen in investigation through local inquiry committee of nagpur university

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अधिष्ठातांकडून तयार करण्यात येणाऱ्या स्थानिक चौकशी (एलईसी) समितीत विषयतज्ज्ञ म्हणून त्या-त्या विषयांच्या प्राध्यापकांचा समावेश करण्यात येतो. मात्र, असे असताना विज्ञान, अभियांत्रिकीच्या महाविद्यालयांच्या तपासणीसाठी तयार करण्यात आलेल्या समितीत चक्क कला शाखेचे प्राध्यापक गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकाराचे पडसाद विद्यापीठाच्या विद्वत परिषदेच्या बैठकीत उमटल्याची माहिती आहे. 

महाविद्यालयात इन्फ्रास्ट्रक्‍चर आणि विद्यार्थ्यांसाठी सोयी-सुविधा आहे किंवा नाही, याची तपासणी करण्यासाठी स्थानिक चौकशी समिती नेमल्या जाते. समितीद्वारे महाविद्यालयात असलेल्या सोयी-सुविधांबद्दल गुणांकन दिल्या जाते. त्यावर महाविद्यालयांना संलग्नीकरण मिळत असते. साधारणतः १० वर्ष शिकविण्याचा अनुभव असलेल्या प्राध्यापकाला अध्यक्ष तर सात वर्षे अनुभव असलेल्या प्राध्यापकाला सदस्य म्हणून निवडता येते. ही निवड विद्वत परिषदेमार्फत अधिष्ठाता करीत असतात. हे करीत असताना, ज्या शाखेच्या महाविद्यालयाची तपासणी करायची असते, त्या शाखेतील अनुभवी प्राध्यापकांच्या समावेश करण्यात येतो. मात्र, सध्या तयार करण्यात आलेल्या समितीत चक्क कला आणि वाणिज्य शाखेतील प्राध्यापकांची नेमणूक करण्यात आल्याचे समजते. या प्राध्यापकांचा समावेश असलेल्या समितीने वर्धा मार्गावरील शरद पवार सायन्स कॉलेजचा स्थानांतरण प्रस्तावासाठी गेलेल्या समितीत, सेवादल महाविद्यालय, यादवराव भोयर फार्मसी कॉलेज आणि इतर अभियांत्रिकी महाविद्यालयांचा समावेश आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी महाविद्यालयांची तपासणी करण्यासाठी तयार करण्यात येत असलेल्या स्थानिक चौकशी समितीत निवड झाल्याचे दिसून आले आहे. याबाबत विद्वत परिषदेमध्ये चर्चा करण्यात आली. त्यामुळे समिती बदलण्याचा निर्णय घेऊन विषयाचे तज्‍ज्ञ प्राध्यापक नेमण्याचे आदेश देण्यात आले. 

वेळोवेळी उठला मुद्दा -
स्‍थानिक चौकशी समितीबाबत गेल्या अनेक वर्षांपासून ताशेरे ओढण्यात येत आहे. विशेष म्हणजे सिनेटमध्ये यापूर्वीही अनेकदा एलईसीचा मुद्‌द्‌यावर प्रशासनाला सदस्यांनी घेरले आहे. यावेळीही डॉ. धनश्री बोरीकर यांनी हा प्रश्‍न लावून धरला. मात्र, त्यावर चर्चा झाली नाही. मात्र, गटाचा दबावातून होत असलेल्या राजकारणामुळे महाविद्यालयांची निष्पक्ष चौकशी होणार तरी कशी हा प्रश्‍न सातत्याने समोर येत आहे. 

एकच व्यक्ती अनेक समित्यांवर - 
विद्यापीठाच्या स्थानिक चौकशी समितीवर एकाच व्यक्तीची सातत्याने निवड होत असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे या व्यक्तीबाबत बराच रोष निर्माण होताना दिसून येत आहे. याशिवाय अनुभवी असलेल्या सदस्यांना वा प्राध्यापकांना डावलून केवळ मर्जीच्याच लोकांची वर्णी लागत असल्याची चर्चा विद्यापीठ वर्तुळात रंगत आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com