वन्यजीव-मानव संघर्ष टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना, काय सांगतात प्रधान मुख्य वनसंरक्षक 

Permanent Measures to Prevent Wildlife-Human Conflict
Permanent Measures to Prevent Wildlife-Human Conflict


नागपूर ः चंद्रपूर जिल्ह्यात वाघांची संख्या अधिक असल्याने वन्यजीव- मानव संघर्ष वाढलेला आहे. त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी शासन गंभीरपणे विचार करीत आहे. या भागातील वाघांसाठी दुसरा अधिवास शोधून स्थलांतरित करणे आणि रेस्क्यू सेंटर वाढविण्याचा विचार केला जात आहे. त्यासाठी अभ्यासगट तयार करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला, अशी माहिती प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नितीन काकोडकर यांनी वन्यजीव सप्ताहाच्या पूर्वसंध्येला ‘सकाळ'शी बोलताना दिली. 

मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी दोन प्रकारच्या उपाययोजना करण्यात येतात. वन्यप्राण्यांनी मानवावर हल्ला केल्यास तातडीने काही उपाययोजना केल्या जातात. त्यात वाघ मानवासाठी धोकादायक ठरत असलेल्या परिसरात कॅमेरा ट्रॉप लावणे, त्याचा मागोवा घेणे, लोकांमध्ये जनजागृती करीत वाघाचे अस्तित्व आलेल्या ठिकाणी जाण्यास मज्जाव करण्यात येतो. याशिवाय एकाच वाघांकडून मानवावर सतत हल्ले होत असेल तर घटनेचे स्वरूप पाहून त्याला जेरबंद करण्यात येते. 

उन्हाळ्यात मोह वेचण्यासाठी लोक सकाळी लवकर जंगलात जातात. वाघांसह वन्यप्राण्यांची ज्या भागात संख्या अधिक आहे. अशा परिसरात गावकऱ्यांना जंगलात मोहफुल गोळा करण्यासाठी उशिरा जाण्याचा सल्ला दिला जातो. मोहफुल वेचणीसाठी झाड्यांच्या खाली जाळ्या लावल्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे मेहाची फुले वरच्या वर पडता आणि लवकरात लवकर मोहफुले गोळा होतात. मोहफुले पाला पाचोळ्यात पकडल्यास ते गोळा करण्यासाठी वेळ लागतो. हल्ले होण्याची शक्यता घेता या उपाययोजनांवर भर दिला जात आहे. यातून हल्ले कमी होतील. तसेच मोबाईल व रेडिओवर गाणे लावण्याच्या सुचनाही दिल्या जातात. त्यामुळे वन्यप्राण्यांना मानवाचा वावर असल्याचे लक्षात येईल. आणि वन्यप्राण्याचे मानवावरील हल्ले कमी होण्यास मदत झालेली आहे. 

वाघांचा अधिवास असलेल्या चद्रपूर जिल्ह्यातील काही गावांमध्ये गस्त करण्याकरिता गावातील युवकांची प्रायमरी रिस्पॉन्स टिम तयार केल्या आहेच. त्यात गावातील तीन ते चार मुलांचा सहभाग असतो. त्यासाठी त्यांनी वन विभागाकडून मानधन दिले जाते. ती टीम गस्त करीत असताना वाघाचे अस्तित्व असल्यास गावातील नागरिकांना कळवितात. त्यामुळे वन विभाग व गावकऱ्यांसाठी ते दुवा ठरत असून गावकऱ्यांची जंगलाबद्दलची आत्मीयता वाढू लागली आहे. गावकऱ्यांचे जंगलावरील अंवलबत्व कमी करण्यासाठी श्यामा प्रसाद मुखर्जीसह अनेक योजना राबविण्यात येत आहेत. 

वन्यप्राण्यांचे भ्रमण मार्ग खंडित 

विकास कामांना कोणाचाच विरोध नाही, विकास होणार हेही अपेक्षित आहे. विकासामुळे जंगल विखुरले जात असल्याने एका जंगलातून दुसऱ्या जंगलात वन्यप्राण्याचे भ्रमण मार्ग खंडीत होतात. त्यामुळे मानव व वन्यजीव संघर्ष वाढतो. त्याला कमी करण्यासाठी उपशमन योजना तयार करण्याचा विचार सुरू आहे. काही चांगली कामेही झाली आहे. सिंचन प्रकल्प, कॅनॉल, रस्ते व इतर विकास कामे करताना उपशमन योजना काय करता येतील याचाही गंभीरपणे विचार केला जात आहे. त्याच्या मुख्य उद्देश जंगलाचे तुकडे तुकडे होणार नाही हाच आहे. गोसीखुर्दचा कॅनालवर २४ ठिकाणी उपशमनाचा अवलंब केल्या आहे. वन्यप्राणी एका जंगलातून दुसऱ्या जंगलात जाण्यासाठी त्याचा वापर करीत आहेत असेही काकोडकर म्हणाले. 

मुख्यमंत्र्यांनी दिली होती सूचना 

वन्यजीव व्यवस्थापनाचे आव्हान वाढते हे बरोबर आहे. त्यादृष्टीने शासनाकडून सतत पावले उचलण्यात येत आहेत. राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी वाघांच्या स्थलांतरासाठी अभ्यास गट तयार करण्याचा सूचना दिली आहे. यापूर्वीही प्रधान मुख्य वनसंरक्षकांच्या अध्यक्षतेखाली अभ्यासगट होता. आता त्याची व्याप्ती वाढविण्यासाठी सर्वसमावेशक अभ्यास गट स्थापन करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविलेला आहे. त्यात अधिक लोकांचे मत घेतले जावे हा उद्देश या अभ्यास गटाचा आहे असेही काकोडकर यांनी सांगितले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com