दुष्काळात तेरावा महिना : पेट्रोल, डिझेलचा उडणार भडका

शनिवार, 30 मे 2020

दोन महिन्यांतील ही दुसरी वाढ असणार आहे. यापूर्वी एप्रिल महिन्यात पेट्रोल आणि डिझलेवर एक रुपयाचा अतिरिक्त सेस लावला होता. कोरोनासाठी हा सेस लावण्यात आल्याचे सांगण्यात येत होते. दोनच महिन्यांत सरकारने पुन्हा दोन रुपयांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा दोन रुपयांचा अतिरिक्त सेस लावण्याचा निर्णय घेतला आहे. 

नागपूर : कोरोनामुळे आधीच लोकांच्या हाताला काम नाही. हातातील पैसेही संपण्याच्या मार्गावर आहेत. रोजचा भाजीपाला खरेदी करणे अवघड होऊन बसले आहे. दुसरीकडे सरकार महागाईत भर घालणार आहे. पेट्रोल व डिझेलच्या दरात दोन रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सोमवारपासून हे दर लागू होतील. कोरोनामुळे झालेले नुकसान सरकार सामान्यांच्या खिशातून काढण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसते. 

दोन महिन्यांतील ही दुसरी वाढ असणार आहे. यापूर्वी एप्रिल महिन्यात पेट्रोल आणि डिझलेवर एक रुपयाचा अतिरिक्त सेस लावला होता. कोरोनासाठी हा सेस लावण्यात आल्याचे सांगण्यात येत होते. दोनच महिन्यांत सरकारने पुन्हा दोन रुपयांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा दोन रुपयांचा अतिरिक्त सेस लावण्याचा निर्णय घेतला आहे. 

महागाई वाढणार 
डिझेलचे दर वाढल्याने याचा थेट परिणाम वाहतुकीवर होणार आहे. वाहतूक सेवा अधिक महाग होईल. याचा थेट परिणाम वस्तूच्या किमतीवर होणार असून भाजीपाला व इतर साहित्याच्या दरात वाढ होईल. बस तिकिटांच्या दरातही वाढ होण्याची शक्‍यता आहे. 

नागपुरात पेट्रोल 80 रुपये 
नागपुरात पेट्रोल 80 रुपयांच्या घरात जाणार आहे. नागपूर शहरात पेट्रोलचे दर 76.78 रुपये आहे. दोन रुपयांची भर पडल्यास 78.78 रुपये होईल. तर, डिझेल 66.74 रुपये असून ते 68.74 रुपये होईल. 

हेही वाचा : त्यांनी पुन्हा आक्रमण केले, पण काढावा लागला पळ...वाचा सविस्तर 

आयआरडीपीचा बोझा केव्हा होणार कमी? 
आयआरडीपीच्या माध्यमातून नागपूर शहरातील रस्ते मोठे करण्यात आलेत. यावरील खर्च काढण्यासाठी पेट्रोलवर 1 तर डिझेलवर 3 टक्के अतिरिक्त सेस लावण्यात आला होता. हा सेस गेल्या 20 वर्षांपासून आकारण्यात येत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फडणवीस सरकारच्या काळात एमएसआरडीसीला आवश्‍यक संपूर्ण निधी देण्यात आला. त्यानंतर हा सेस वसूलण्यात येत आहे.