महागाईसोबतच आता पेट्रोल दरवाढीचा भडका...जाणून घ्या किमती

बुधवार, 24 जून 2020

सलग 83 दिवस पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर ठेवल्यानंतर इंधन कंपन्यांनी आता ग्राहकांचा खिसा हलका करण्यास सुरुवात केली आहे.

नागपूर : टाळेबंदीमुळे नागरिक आर्थिक संकटात सापडलेला असताना दुसरीकडे सलग 23 दिवसांपासून दररोज पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढत आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री लागल्याने अनेकांचे बजेट कोलडून गेले आहे.

नागपुरात बहरले सोनू सूदचे प्रेम; शंकरनगरातील ब्रेड पकोडा व कटिंग चहाचा होता दिवाना

गेल्या 23 दिवसांत पेट्रोलच्या दरात 8 रुपये 25 पैसे तर डिझेलच्या दरात 7 रुपये 79 पैशाची वाढ झालेली आहे. मंगळवारी शहरात पेट्रोलचा दर पेट्रोल87.05 तर डिझेलचे दर 76.53 रुपये इतके झाले आहेत. 

सलग 83 दिवस पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर ठेवल्यानंतर इंधन कंपन्यांनी आता ग्राहकांचा खिसा हलका करण्यास सुरुवात केली आहे. सर्वसाधारणपणे शहरात दररोज 9 लाख लिटर पेट्रोलची विक्री होते, परंतु संचारबंदीच्या काळात शहरातील अनेक रस्ते, बाजारपेठ,

कार्यालय बंद असल्याने अत्यावश्‍यक सेवा वगळता तुरळक वाहतूक सुरू होती. त्यामुळे ही विक्री फक्त एक लाख लिटरवर आली होती. या काळात सलग 83 दिवस पेट्रोलचे दर 78.80 रुपये आणि -डिझेलचे दर 68.78 पैशांवर स्थिर होते. 

अनलॉक होताच दुकाने उघडली आहेत, तर कमी मनुष्यबळावर खासगी कार्यालये सुरू झाली आहेत. याच काळात इंधन वाढीचा फटका नागपूरकरांना बसू लागला आहे. एक जूनपासून दररोज कधी 40 पैसे, कधी 50 पैसे, तर कधी 20 पैसे असे पेट्रोल डिझेलचे दर वाढत आहे. याचा फटका मध्यमवर्गीयांना चांगलाच बसू लागला आहे. 

६ जून 
पेट्रोल 78.80 
डिझेल 68.74 

14 जून 
पेट्रोल 83.19 
डिझेल 73.18 

22 जून 
पेट्रोल  86.26 
डिझेल  76.02 

23 जून 
पेट्रोल 87.05 
डिझेल 76.53