
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ॲड. शिरीष कोतवाल (६०) आणि पत्नी गौरी हे १२ डिसेंबरला सकाळी साडेसात वाजता चहा घेत होते. दरम्यान आरोपी डोमेश्वर कावरे त्यांच्या घरात घुसला. गौरी यांच्या गळ्याला चाकू लावून रूपयांची मागणी केली.
नागपूर ः एका वृद्ध वकिलाच्या घरात घुसून चाकूच्या धाकावर लुटमार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला सक्करदरा पोलिसांनी अटक केली. सीसीटीव्हीच्या फुटेजवरून आरोपीची ओळख पटविली. डोमेश्वर कुंवरलाल कावरे (२४, रा. भोलेगाव, बालाघाट-मध्यप्रदेश) असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ॲड. शिरीष कोतवाल (६०) आणि पत्नी गौरी हे १२ डिसेंबरला सकाळी साडेसात वाजता चहा घेत होते. दरम्यान आरोपी डोमेश्वर कावरे त्यांच्या घरात घुसला. गौरी यांच्या गळ्याला चाकू लावून रूपयांची मागणी केली.
कोतवाल यांनी प्रतिकार करीत पत्नीची सुटका केली आणि बाहेर जाऊन आरडाओरड केली. नागरिकांनी मदत करीत डोमेश्वरला पकडले आणि त्याची चांगली धुलाई केली. दरम्यान डोमेश्वर पळून गेला. दोन दिवसांनंतर कोतवाल यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी परीसरातील सीसीटीव्ही फुटेज वरून आरोपीला ताब्यात घेतले.
नक्की वाचा - घरी काम करणाऱ्या मजुरांनी स्लॅब टाकण्याची केली तयारी अन् तेवढ्यात आला धडकी भरवणारा आवाज
असे पोहचले पोलिस घरी
पोलिसांनी जवळपास सर्वच रस्त्यांचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. त्यामध्ये डोमेश्वर हा आवारी चौकातून हनुमाननगरातील घरी पोहचल्याचे दिसले. त्यामुळे त्याला थेट घरातून पोलिसांनी ताब्यात घेतले. डोमेश्वर लॉकडाऊन लागल्यापासून बेरोजगार होता. आर्थिक चणचणीतून त्याने लुटमार करून पैसा कमविण्याचा प्रयत्न केला. बुधवारी त्याला न्यायालयात उपस्थित करण्यात येईल. ही कारवाई डीसीपी डॉ. अक्षय शिंदे, पोलिस निरीक्षक सत्यवान माने यांच्या मार्गदर्शनात पीएसआय प्रकाश वानखडे, निलेश ढोणे, नितीन राऊत, किशोर हाते, सायबर एक्सपर्ट दिपक तऱ्हेकर, मिथून नाईक यांनी केली.
संपादन - अथर्व महांकाळ