Video : माझ्या वडिलांना अटक केल्याने पोलिस झालो 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 डिसेंबर 2019

नागपूर शहरात यापूर्वी मी जबाबदारी पार पाडली आहे. आता शहरातील सोयी-सुविधांमध्ये खूप बदल झाला. आधी बेरोजगारी होती. त्यामुळे गुन्हेगारीकडे लोक वळत होते. पोलिसांची संख्या वाढविल्याने गुन्हे कमी होणार नाही. बेरोजगार तरुणांना उद्योग, व्यवसाय आणि नोकरी मिळाल्यास गुन्हेगारी क्षेत्रापासून ते दूर राहतील. 

नागपूर : मला पोलिस विभागात यायचे नव्हते. माझे वडील शिक्षक असल्याने सहाजिकच माझी ओढ त्या दिशेने होती. मला संस्कृतचा प्राध्यापक बनायचे होते. मात्र, एका घटनेमुळे मी या क्षेत्रात आलो. माझ्या वडिलांना पोलिसांनी एका घटनेत अटक केली. वास्तविक त्यांना त्यांच्याच नावाच्या दुसऱ्या व्यक्तीला अटक करायची होती. न्यायालयाला ही चूक लक्षात आल्याने नंतर त्यांना निर्दोष सोडले. या घटनेनंतर मी मनात पोलिस अधिकारी बनायचा निश्‍चय केल्याचे पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी सांगितले. 

चिटणवीस सेंटरतर्फे "कलावंताच्या मनातील मान्यवर' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या तिसऱ्या पुष्पामध्ये पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांची मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. एस. पी. सिंग यांनी त्यांच्याशी संवाद साधला. माझे वडील हिंदीचे शिक्षक होते. मात्र, माझी आवड संस्कृत विषयात होती. माझ्या वडिलांनी मला संस्कृत शिकण्याची मुभा दिली. भविष्यात संस्कृत विषयाचाच प्राध्यापक बनायचे, असे ठरवले होते.

संस्कृत विषयामध्ये पहिला येत त्यावेळी मी विद्यापीठाचे सर्व रेकॉर्ड मोडले. आज मी जो काही आहे तो संस्कृत भाषेमुळेच. माझ्या मुलांना संस्कृतचे सर्व स्तोत्र पाठ आहेत, असे डॉ. भूषणकुमार म्हणाले. कार्यक्रमात सचिन ढोमणे यांच्या संगीतासह काही निवडक गीते सादर करण्यात आली. भूषणकुमार उपाध्याय यांचे पोट्रेट अमित गोनाडे यांनी व उमेश चारोळे यांनी व्यंगचित्र काढले. संकल्पना रवींद्र दुरुगकर यांची होती.

जाणून घ्या - Video : हाही एक 'दशरथ मांझी', वाचा ही कहाणी

पोलिसांची संख्या वाढविल्याने गुन्हे कमी होणार नाही

नागपूर शहरात यापूर्वी मी जबाबदारी पार पाडली आहे. आता शहरातील सोयी-सुविधांमध्ये खूप बदल झाला. आधी बेरोजगारी होती. त्यामुळे गुन्हेगारीकडे लोक वळत होते. पोलिसांची संख्या वाढविल्याने गुन्हे कमी होणार नाही. बेरोजगार तरुणांना उद्योग, व्यवसाय आणि नोकरी मिळाल्यास गुन्हेगारी क्षेत्रापासून ते दूर राहतील. नागपूरमध्ये मेडिकल इन्स्टिट्यूट, कॅन्सर हॉस्पिटल अशा अनेक गोष्टी आहेत, असे डॉ. भूषणकुमार म्हणाले. 

क्लिक करा - व्वारे डॉक्‍टर! युवतीला केली शरीरसुखाची मागणी

Image may contain: 1 person

मी स्वतःला नागपूरकर मानतो 
माझ्या तीस वर्षांच्या काळात दहा वर्षांचा काळ मी नागपुरात घालवला. मी स्वतःला नागपूरकर मानतो. मला निवृत्त झाल्यावर नागपुरात रहायचे आहे. 
- डॉ. भूषणकुमार उपाध्याय, 
पोलिस आयुक्त


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police Commissioner Dr. Bhushan Kumar Upadhyay says, Arresting my father that's why I became a policeman