नागपुरमध्ये पॉश फ्लॅटमधील सेक्‍स रॅकेटवर छापा

बुधवार, 10 जून 2020

देहव्यापारामध्ये सापडलेली एक 21 वर्षीय तरुणी गोंदियाची आहे. लॉकडाउनमुळे आर्थिक अडचण आल्यामुळे गोंदियातून ती देहव्यापारासाठी आली होती. दुसरी 22 वर्षीय तरुणी वर्धा रोडवर राहते. जास्त पैसे मिळत असल्याने तरूणी देहव्यापाराकडे वळल्या.

नागपूर : कोराडीतील एका पॉश इमारतीत सुरू असलेल्या सेक्‍स रॅकेटवर डीसीपीच्या विशेष पथकाने मंगळवारी छापा घातला. या छाप्यात देहव्यापार करणाऱ्या दोन तरुणींना ताब्यात घेण्यात आले, तर त्यांच्याकडून वेश्‍याव्यवसाय करवून घेणाऱ्या दलालाला अटक करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उपराजधानीतील दलाल चंद्रशेखर सुब्रमण्यम मुदलीयार (वय 45, प्लॉट क्र. 75, विजय को-ऑपरेटिव्ह सोसायटी, कोराडी नाका) हा पुन्हा सक्रिय झाल्याची माहिती झोन पाचचे पोलिस उपायुक्‍त नीलोत्पल यांच्या विशेष पथकाचे प्रमुख प्रशांत अन्नछत्रे यांना मिळाली. मंगळवारी सायंकाळी चंद्रशेखरकडे बोगस ग्राहक (पंटर) पाठविण्यात आला. त्याने दोन तरुणींची मागणी केली. चंद्रशेखरने सहा हजार रुपयांमध्ये दोन तरुणींचा सौदा केला. तसेच दोन्ही तरुणींना पाचशे रुपये देण्याची अट घातली.

वाचा- जावई-सासऱ्याने दारूच्या नशेत उकरून काढला जुना वाद अन्‌ मग घडले असे

चंद्रशेखरने पंटरला विजय को-ऑपरेटिव्ह सोसायटी, कोराडी नाका येथे नेले. दोन्ही तरुणी रूममध्ये बसलेल्या होत्या. पंटर रूममध्ये गेल्यानंतर त्यांने पोलिसांना इशारा केला. दबा धरून बसलेल्या पोलिसांनी लगेच छापा घालून दोन्ही तरुणींना ताब्यात घेतले, तर दलालाला अटक केली. ही कामगिरी एपीआय प्रशांत अन्नछत्रे, विनोद सोनटक्‍के, मृदुल नगरे, चेतन जाधव, योगेश ताथोड, अशोक दुबे, रवींद्र राऊत, विद्या ठाकूर आणि गौरी हेडाऊ यांनी केली.

आर्थिक चणचणीमुळे देहव्यापार

देहव्यापारामध्ये सापडलेली एक 21 वर्षीय तरुणी गोंदियाची आहे. लॉकडाउनमुळे आर्थिक अडचण आल्यामुळे गोंदियातून ती देहव्यापारासाठी आली होती. दुसरी 22 वर्षीय तरुणी वर्धा रोडवर राहते. हॉटेलमध्ये काम करताना ग्राहकांनी तिला ऑफर दिली होती. पगारापेक्षा चौपट पैसे कमवीत असल्यामुळे ती देहव्यापाराकडे वळली, अशी माहिती सूत्रांनी दिली.