पोट्ट्यांनो उतमात करू नका, अन्यथा...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 डिसेंबर 2019

पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्यासह चार हजार तीनशे पोलिस अधिकारी व कर्मचारी शहराच्या वेगवेगळ्या भागात पाळत ठेवून असतील. शंभर फिक्‍सपॉइंट निश्‍चित करण्यात आले आहेत. त्याशिवाय 75 ठिकाणी नाकाबंदी राहील. शंभर जीप पॅट्रोलिंग आणि दीडशे बीट मार्शल गस्त घालत असतील. 

नागपूर : सरस्त्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नव्या वर्षाच्या स्वागतासाठी नागपूरकर सज्ज झाले आहेत. कोणत्याही प्रकारच्या अप्रिय घटना टाळण्यासाठी शहर पोलिस दलसुद्धा सज्ज झाले आहेत. भरधाव वाहन चालविणारे, तरुणी-महिलांची छेड काढणाऱ्यांवर नियंत्रणासह हुल्लडबाजांची "झिंग' उतरविण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. शहरात चार हजार तीनशे पोलिस अधिकारी व कर्मचारी पाळत ठेवून असतील.

कसं काय बुवा? - अस्सल नागपुरी "दिमाग'; घरातच उघडले चक्क पेट्रोल पंप

मंगळवारी सायंकाळपासूनच शहरात सर्वत्र पोलिसांचा खडा पहारा राहणार आहे. फुटाळा तलाव, वेस्ट हायकोर्ट रोड, धरमपेठ आदी भागांमध्ये पोलिस तैनात असतील. महिला वर्गाच्या सुरक्षेच्या दृष्टीने गर्दीच्या ठिकाणी सामाजिक सुरक्षा विभागाचे पथक आणि महिला सेलचे कर्मचारी लक्ष ठेवून असतील. भरधाव वाहन दामटणाऱ्यांना आवर घालण्यासाठी स्पीडगनची मदत घेतली जाणार आहे. मद्यपी वाहनचालकांवर कारवाईसाठी फक्‍सपॉइंट आणि नाकाबंदीचे नियोजन करण्यात आले आहे. मद्यपी वाहनचालकांनी हुज्जत घातल्यास थेट कोठडीत डांबण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. गरजेनुसार गणवेशधारी पोलिसांसह साध्या वेशातील कर्मचारीसुद्धा तैनात असतील.

Image result for nagpur police

पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्यासह चार हजार तीनशे पोलिस अधिकारी व कर्मचारी शहराच्या वेगवेगळ्या भागात पाळत ठेवून असतील. शंभर फिक्‍सपॉइंट निश्‍चित करण्यात आले आहेत. त्याशिवाय 75 ठिकाणी नाकाबंदी राहील. शंभर जीप पॅट्रोलिंग आणि दीडशे बीट मार्शल गस्त घालत असतील. गुन्हेशाखेचे 12 आणि चार बॉम्बशोधक व नाशक पथकही सक्रिय असणार आहेत.

सविस्तर वाचा - घरी सुरू होती लग्नाची तयारी अन् कोसळले दुःखाचे डोंगर

फुट्याळ्यावरील मस्ती येईल अंगात

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी फुटाळा तलावावर महाविद्यालयीन युवक आणि युवतींची मोठी गर्दी असते. तसेच फुटाळ्यावर डीजे-स्पिकर्सवर धांगडधिंगाही सुरू असतो. याचा फायदा काही टारगट मुले घेतात. तरुणींवर शेरेबाजी करणे, छेडखानी करणे, मुलींचा पाठलाग करणे तसेच मुलींना चिडवणे असे प्रकार करतात. मात्र, यावेळी साध्या वेशात महिला पोलिस कर्मचारी फुटाळ्यावर तैनात करण्यात आले आहेत. त्यामुळे छेडखानी करणाऱ्यांची रात्र पोलिस कोठडीत जाण्याची शक्‍यता आहे.

Image result for nagpur police

टेरीस पार्ट्या

शहरात काही युवक "टीटीएमएम' (तुझं तू-माझं मी) करून घराच्या टेरिसवर पार्ट्या करतात. येथे मटन-चिकनसह दारूचा बेत असतो. कुटुंबीयांना केवळ मटन पार्टी सांगितल्यानंतर दारूचे ग्लासवर ग्लास मित्रमंडळी रिचवत असतात. अशा पार्ट्यांवर यावर्षी पोलिस नजर ठेवणार आहेत. पोलिसांना माहिती मिळाल्यास चौकडींना रात्रभर पोलिस कोठडीत राहावे लागणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police will be watching over drunk parties in Nagpur