आता ऐकू येतोय सगळीकडे मधुर किलबिलाट

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 एप्रिल 2020

लॉकडाउननंतर आता दिल्लीत अनेक वर्षांनंतर हवामानाची स्थिती चांगली, वायू प्रदूषण कमी झाल्याची नोंद करण्यात आली. महाराष्ट्रासह देशातील बहुतेक सर्वच शहरात हवेच्या गुणवत्तेत सुधारणा झाली आहे. शहरातही पक्ष्यांचा किलबिलाट वाढला आहे.

नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाउन केल्याने अनेक कारखाने, उद्योग बंद आहेत. वाहनांची वर्दळ मंदावल्याने हवामानाच्या गुणवत्तेत सुधारणा झाली आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या हवा गुणवत्ता निर्देशांकानुसार हवेतील प्रदूषणाची पातळी कमी झाली आहे. हवेच्या गुणवत्तेत सुधारणा झाल्याने पक्षीही शहरात परतत अाहे.

शहरात 2019 च्या मार्च व एप्रिलच्या तुलनेत 2020 मध्ये 40 ते 50 टक्‍क्‍यांनी धूळ, वायू प्रदूषण कमी झाले असल्याचे आकडेवारीवरून निदर्शनास आले.

श्‍वसनासाठी धोका वाढवू शकणाऱ्या, नायट्रोजन ऑक्‍साईड, प्रदूषणासोबतच सल्फर-डाय ऑक्‍साईड, कार्बन मोनॉक्‍साईड आणि धूळ प्रदूषणाची पातळी कमी झाली. नायट्रोजन ऑक्‍साईडचं प्रदूषण मुख्यतः मोटार वाहनांच्या वाहतुकीमुळे होते. पुण्यात नायट्रोजन ऑक्‍साईडचं प्रमाण महाराष्ट्रतील मुंबई, पुणे, औरंगाबाद, चंद्रपूर, नाशिक अशा प्रदूषित शहरात 40 ते 50 टक्‍क्‍यांनी कमी झाले.
लॉकडाउनमुळे अनेक व्यवसाय बंद आहेत. अनेक जण "वर्क फ्रॉम होम' करीत आहेत. त्यामुळे रस्त्यांवर वाहतूक कमी आहे. अनेक कंपन्या बंद असल्याने कच्च्या मालाच्या होणाऱ्या पुरवठ्यासाठीची वाहतूकही बंद आहे.

वाहतूक बंद असल्याने गाड्यांचा धूर, धूळही कमी झाली आहे. कधीही न थांबणारी मुंबई, पुणे, नागपूरसारखी अनेक मोठी व्यापारी शहरे ठप्प असल्याने प्रदूषण कमी झाले आहे. दिल्लीतील प्रदूषणाची स्थिती अतिशय वाईट होती. नागरिकांना रस्त्यांवरून चालताना मास्क लावावे लागत होते. पण, लॉकडाउननंतर आता दिल्लीत अनेक वर्षांनंतर हवामानाची स्थिती चांगली, वायू प्रदूषण कमी झाल्याची नोंद करण्यात आली. महाराष्ट्रासह देशातील बहुतेक सर्वच शहरात हवेच्या गुणवत्तेत सुधारणा झाली आहे. शहरातही पक्ष्यांचा किलबिलाट वाढला आहे.

सविस्तर वाचा - कोरोनाच्या तपासणीबाबत नितीन गडकरींनी दिले हे महत्वपूर्ण आदेश

वायू प्रदूषण (तारीख) 2019 - 2020
मार्च 20- 207 - 75
मार्च 21- 128 - 78
मार्च 22- 91 - 71
मार्च 23- 119 - 83
मार्च 24- 140 - 75
मार्च -25 -104 - 82
मार्च-30- 126 - 75
मार्च-31-151 - 76
एप्रिल-1- 82 - 72
एप्रिल-2- 156 -77
एप्रिल-3-176-91
एप्रिल-4- 160 - 80
एप्रिल-5- 102- 91
एप्रिल 6 - 122 - 98
(प्रदूषणाची आकडेवारी सिव्हिल लाइन्स येथील प्रदूषण मापन यंत्रणेद्वारे घेतली आहे.)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Polution rate is down & birds are chirping